avkali paaus 2024 सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असून यामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकांसाहित घरे, शेतातील पिके व पाळीव प्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मागील दोन ते तीन दिवसापासून हा वादळी वाऱ्यासह पाऊस भाग बदलत सुरु आहे. काही ठिकाणी गारांचा देखील पाउस झाल्याने अतोनात नुकसान होत आहे.
दुष्काळ नुकसान अनुदान मिळविण्यासाठी लगेच पिक विमा कंपनीस माहिती द्या पहा कशी आहे पद्धत.
राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणखीन दोन ते तीन दिवस असाच सुरू राहणार आहे.
कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे, मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पडणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह पश्चिम विदर्भ आणि आसपासच्या भागात सध्या सक्रिय स्थिती आहे त्यामुळे विदर्भासह राज्यात उर्वरित भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय.
अजून दोन ते तीन दिवस सुरु राहणार अवकाळी पाऊस
हा अवकाळी पाउस पुढील दोन तीन दिवस असाच सुरु राहणार असल्याने शेतकरी बांधवांची चिंता अजून वाढणार आहे. या अवकाळी पावसापासून सुरक्षा व्हावी यासाठी शेतकरी बांधवानी आपली गुरे ढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.
संध्याकाळी पाऊस तर दुपारी कडक उन यामुळे नागरिक खूप परेशान होत आहे. तीव्र उष्णतेची लाट सुरूच आहे.
मालेगाव शहराचे तापमान हे 41 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. राज्यात विशेषता पश्चिम विदर्भात गेल्या आठवड्यापासून गारपीट अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. विदर्भाबरोबरच आता मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम विदर्भ आणि आसपासच्या भागात सध्या सक्रिय स्थिती आहे त्यामुळे विदर्भासह राज्यात उर्वरित भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.
पाऊस सुरु तरीही उष्णतेची लाट कायम
तरीही उष्णतेची लाट पाऊस बरसात असला तरी दिवसा तीव्र उष्णतेचे लाड सुरूच आहे सोमवारी मालेगाव भागात 41 अंश सेल्सिअस नोंदवलेले या भागासह राज्याच्या बहुतेक भागात कमाल तापमानाचा पाढा 39 ते 40°c आसपास नोंदविले गेले आहे.
या पावसामुळे उष्णतेपासून काही प्रमाणत सुटका मिळेल असे वाटत असतांना दुपारी मात्र जीवघेणा उकाडा होत असल्याने नागरिक मात्र त्रस्त आहे.
सध्या सरू असलेला अवकाळी पाऊस पावसाळ्यामध्ये येत नाही असा प्रश्न आपणाला पडला असेल तर आता यावर्षी सुद्धा चांगला पाउस होणार असल्याचा हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे.
त्यामुळे यावर्षी चांगला पाउस पडून चांगले पिक हाती येईल अशी अशा आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या सुरु असलेला अवकाळी पाऊस मात्र अजून दोन ते तीन दिवस असाच पडत राहणार आहे हे मात्र नक्की avkali paaus 2024.