शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळ अनुदान जमा झाले असून या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याना शासनाकडुन मदत जाहीर झाली होती. ही मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.
शासनाच्या वतीने मदत जाहीर करून बरेच दिवस झाले तरी अनुदानाची रक्कम जमा केंव्हा होईल हा प्रश्न शेतकरी बांधवाना पडला होता.
दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर NPCI Mapping form बँकेत जमा करा फॉर्म pdf मध्ये download करा.
85 रूपये गुंठा याप्रमाणे मिळणार अनुदान
तालुका निहाय नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ज्या त्या गावातील आपले सरकार केंद्र चालकांच्या डॅशबोर्डला येत असून ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीमध्ये आले आहे त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावून ekyc करून घ्यावी.
शेतकऱ्यांना शासनाकडुन प्रती गुंठा 85 रूपये याप्रमाणे ही रक्कम दिली जाणार आहे. बरेच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधू शकता.
हि मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असून एन पेरणीच्यावेळी शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी याची शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
अशी बघा दुष्काळ अनुदान यादी
तुमच्या गावातील किंवा गावाजवळच्या कोणत्याही ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र असेल तर ते हि दुष्काळ यादी बघू शकतात. यामध्ये तुम्ही तुमचे नाव आहे किंवा नाही हे तपासू शकता. तुमचे नाव जर दुष्काळ यादीमध्ये असेल तर लगेच ekyc करून घ्या.
Ekyc केल्यावर आपले सरकार सेवा केंद्र चालक तुम्हाला एक पावती देतील ती देखील सांभाळून ठेवा. विशिष्ठ क्रमांकाच्या आधारे तुमची ekyc केली जाते. त्यामुळे तुमचे नाव या दुष्काळ यादीमध्ये आले असेल तर लगेच ekyc करून घ्या जेणे करून लवकरात लवकर अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकेल.
कधी मिळेल अनुदानाचे पैसे
Ekyc केल्यानंतर साधारणपणे दोन किंवा तीन दिवसात हि रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जावू शकते. मात्र कधी यासाठी जास्त उशीर देखील होऊ शकतो.
ज्यावेळेस दुष्काळ यादीचे चावडी वाचन केले जाते किंवा हि यादी तुमच्या गावामध्ये दर्शनीभागामध्ये लावली जाते त्यावेळी त्यामध्ये काही चुका तर नाही ना याची संबधित शेतकऱ्याने दक्षता घेणे गरजेचे असते.
आधार नंबर नसणे, खाते क्रमांक नसणे असेल तर तो चुकीचा असणे या कारणांमुळे तुम्हाला दुष्काळ अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते.
सर्व काही ठीकठाक असून देखील तुम्हाला दुष्काळ अनुदान मिळाले नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयात या संदर्भात माहिती देवू शकता. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळ अनुदान जमा झाले असून तुम्ही जर तुमची ekyc केली असेल तर तुम्हाला देखील लवकरच हे अनुदान मिळेल