जाणून घेवूयात नवीन मतदान कार्ड डाउनलोड New voter id card download संदर्भात सविस्तर माहिती.
तुमचे मतदान कार्ड हरविले असेल, खराब झाले असेल किंवा तुमचे मतदान कार्ड जुने ब्लॅक अंड व्हाईट असेल आणि आता तुम्हाला नवीन कलरचे मतदान कार्ड हवे असेल तर ते तुम्ही अगदी काही मिनिटात डाउनलोड करू शकता.
सध्या निवडणुकीचे वातावरण असून अशामध्ये जर तुम्हाला तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड मिळाले तर नक्कीच तुमच्यासाठी फायद्याची बाब ठरणार आहे. त्यामुळे हे नवीन मतदान कार्ड डाउनलोड कसे केले जाते हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.
आयुष्यमान कार्ड नसेल तर मिळणार नाही राशन ayushyaman bharat card download
रंगीत नवीन मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील पद्धतीचा उपयोग करा
गुगलमध्ये वोटर आयडी कार्ड असा शब्द टाकून सर्च करा.
E epic download अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसेल epic number आणि form reference number. epic number तुमच्या voter id card अर्थात मतदान ओळखपत्रावर दिलेला असतो. हा नंबर टाकून तुम्ही तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड डाउनलोड करू शकणार आहात.
तुम्ही जर नवीन असाल म्हजेच नुकतेच मतदान करण्यासाठी पात्र असाल आणि अशावेळी तुम्ही मतदान कार्डसाठी अर्ज केला असेल तर अर्ज केल्यावर तुम्हाला form reference number मिळतो त्या आधारे देखील तुम्ही तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.
असे करा मतदान कार्ड डाउनलोड
तुम्ही जर नवीन रंगीत मतदान कार्डसाठी अर्ज केला असेल तर form reference number हा पर्याय निवडा.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
त्यामध्ये तुमचा voter id card from reference number टाका.
तुमचे राज्य निवडा आणि सर्च करा.
जसेही तुम्ही सर्च कराल त्यावेळी तुमचे सर्व डीटेल्स तुम्हाला दिसेल जसे कि Epic number, Name, Relative Name, State AC, mobile number, Email id इत्यादी.
या ठिकाणी तुम्हाला Sent OTP असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
जसे हि तुम्ही Sent OTP या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp पाठविला जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून verify करायचा आहे.
epic number द्वारे डाउनलोड करा कार्ड
from reference number चा संदर्भ टाकून कार्ड डाउनलोड करतांना कदाचित तुम्हाला otp समस्या उद्भवण्याची अशक्यता असते. असे जर झाले तर अशावेळी या ठिकाणी दिसत असलेला epic number कॉपी करून ठेवा आणि epic number या पर्यायावर क्लिक करून परत तुमचे मतदान कार्ड डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा.
अशीच प्रोसेस आहे. या ठिकाणी परत एकदा तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर otp पाठविला जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहे.
OTP Verification done successfully असा संदेश आल्यावर तुम्हाला Download e EPIC असे बटन दिसेल त्यावर क्लिक करताच तुमचे नवीन रंगीत मतदान कार्ड डाऊनलोड होईल.
अशा पद्धतीने आपण जाणून घेतले आहे कि मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता.