पीएम किसान सन्मान निधीचे 2 हजार रुपये मिळाले नाही तर काय करावे जेणे करून या योजनेचा पुन्हा लाभ घेता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी दिलेले आहे.
अनेकांना नुकतेच पीएम किसान सन्मान निधीच्या १७ व्या हफ्त्याचे २ हजार रुपये मिळालेले आहेत. परंतु अनेक शेतकरी बांधवाना हा १७ वा हफ्ता मिळालेला नाही.
तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा हा हफ्ता मिळाला नसेल तर तो का मिळाला नाही. कोणते कागदपत्रे तुम्हाला आवश्यक लागणार आहे काय त्रुटी राहिल्या आहेत या संदर्भात तुम्हाला माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे.
जेणे करून तुम्ही त्या सर्व त्रुटी पूर्ण कराल आणि तुम्हाला परत एकदा पीएम किसान सन्मान निधीचा २ हजार रुपयांचा हफ्ता मिळण्यास सुरुवात होईल.
PM kisan ekyc करा नाहीतर मोदीचा ४००० चा हफ्ता मिळणार नाही.
२ हजार रुपये मिळाले नाही हे आहे कारण.
तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता का मिळाला नाही हे तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलद्वारे चेक करू शकता अगदी सोपी पद्धत आहे.
तुमच्या मोबाईल मधील गुगलक्रोम हे ब्राउजर ओपन करा.
गुगलसर्च मध्ये पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट ओपन करा. अशी जाहिरात दिसत असेल तर ती बंद करा.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
Know your status असा पर्याय शोधा
Know your status असा पर्याय शोधा आणि त्यावर तच करा.
आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेल्या चौकटीत टाकायचा आहे.
तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर काही हरकत नाही जाणून घेवूयात हा रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवायचा.
पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर असा मिळवा
याच ठिकाणी तुम्हाला Know your registration numbr असे निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर टच करा.
रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही दोन पद्धतीने शोधू शकता. मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड.
असे समजूयात कि आपण आपण मोबाईल नंबर टाकणार आहोत.
खालील चौकटीमध्ये कॅपचा कोड टाका आणि get Mobile OTP या बटनावर टच करा.
आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
get details या बटनावर टच करा.
आता या ठिकाणी नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्या.
आता आपल्याला नोंदणी क्रमांक मिळालेला आहे आता परत एकदा मागे या.
पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबरचा आधार घेवून समस्या शोधा
रजिस्ट्रेशन नंबरच्या खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा आता कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर टाका.
कॅपचा कोड टाका आणि get otp या बटनावर क्लिक करा.
आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पुन्हा एकदा otp आलेला असेल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि get deta या बटनावर क्लिक करा.
जसे हि तुम्ही हि क्रिया कराल संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल.
तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता का मिळत नाही हे जाणून घेण्यासाठी पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता का मिळाला नाही याचे कारण दिसेल
या ठिकाणी तुम्हाला काय बघायचे आहे लक्षात घ्या reason for failed transaction हा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे.
परंतु तुम्हाला जर २ हजार रुपयांचा हा हफ्त मिळाला नसेल तर या ठिकाणी सूचना येईल उदाहरणच द्यायचे झाले तर Adhar bank account not seeding. किंवा इतर जे कारण असेल तर कारण स्पष्टपणे लिहिलेले असेल.
पीएम किसान योजनेच्या त्रुटी पूर्ण करा
परत एकदा तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जा आणि संबधित कागदपत्रे सादर करून द्या.
अशा पद्धतीने तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा १७ हफ्ता मिळाला नसेल तर अशा पद्धतीने जाणून घ्या का मिळाला नाही.
त्याची पूर्तता केल्यावर परत एकदा तुम्हाल पीएम किसान सन्मान निधीचा २ हजार रुपयांचा हफ्त मिळणे सुरु होईल.
एकदा का तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळाला कि मग नमो शेतकरी योजनेचा हफ्ता देखील मिळणे सुरु होईल कारण हाच deta नमो शेतकरी विभागाकडे दिला जातो.
अशा पद्धतीने तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे 2 हजार रुपये मिळाले नाही तर सविस्तर माहिती तुम्ही चेक करू शकता.