जिल्हा परिषद योजना 2024 सुरु 100 टक्के अनुदानावर मिळणार लॅपटॉप पिको फॉल शिलाई मशीन मिरची कांडप यंत्र घरकुल योजना

जिल्हा परिषद योजना 2024 सुरु 100 टक्के अनुदानावर मिळणार लॅपटॉप पिको फॉल शिलाई मशीन मिरची कांडप यंत्र घरकुल योजना

जिल्हा परिषद योजना 2024 जाणून घ्या सविस्तर माहिती.

समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरु झाल्या आहेत. या योजनेसाठी करण्याची तारीख 15 जुलै 2024 हि आहे.

जिल्हा परिषद उपकर अंतर्गत 20 टक्के व 5 टक्के दिव्यांग योजनेसाठी 2024 व 25 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागविणे सुरु झाले आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीसाठी आर्थिक मदत नवीन जीआर आला मदत लवकरच होणार खात्यात जमा

जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नबुद्धसाठी आणि 5% दिव्यांगसाठी खर्च करणे आवश्यक असते.

जिल्हा परिषद योजना 2024 मिळणार 100 टक्के अनुदानावर

या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20% उपकारातून व 5% दिव्यांग उपकारातून सन 2024-25 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण भागातील लाभार्थीसाठी खालील काही योजनेसाठी प्रस्ताव मागविले आहेत.

खालील व्हिडीओ पहा

या योजना १०० टक्के अनुदानावर मिळणार आहेत. योजनेचा अर्ज करण्यासाठी 15 जुलै हि शेवटची तारीख असणार आहे.

अर्जदारांनी त्यांचा सविस्तर भरलेला अर्ज पंचायत समिती येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद योजनाअंतर्गत खालील योजनांचा मिळणार लाभ

संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे – 42000.

झेरॉक्स मशीन पुरविणे – 43070.

कडबा कुट्टी मशीन पुरविणे. – 29000.

पिको फॉल शिलाई मशीन. – 9300.

दुग्ध व्यवसायासाठी गाय किंवा म्हैस.-40000.

मिरची कांडप यंत्र. – 20000.

शेळीपालनासाठी शेळीचे गट. – 25000.

दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल योजना. – 120000

अतितीव्र दिव्यांगाना विनाअट निर्वाह भत्ता. – 10000

अस्थीव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल scooter with adaption – 100000.

वरील सर्व योजना ह्या जिल्हा परिषद योजना 2024 अंतर्गत 100 टक्के अनुदानावर मिळणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती येथे अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभाग संभाजी नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद योजना 2024 योजनेसाठी असणारी पात्रता

अर्जदार हा अनुसूचित जाती SC अनुसूचित जमाती ST विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT विशेष मागास प्रवर्ग SBC व नव बौद्ध या घटकातीलच असावा.

संगणक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार बारावी उत्तीर्ण व एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

पिको फॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवण काम करत असल्याचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

वर दिलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे असणे गरजेचे आहे.

अपंगासाठी 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे युडीआयडी प्रमाणपत्र

ज्या योजनेसाठी विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

लाभार्थी जर अपंग असेल तर 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे युडीआयडी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

तहसीलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

लागणारी कागदपत्रे

यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.

आधार कार्डची झेरॉक्स.

घरकुलसाठी आठ अ चा उतारा असणे गरजेचे आहे.

हि योजना फक्त ग्रामीण भागातील लाभार्थीसाठीच असल्याने अर्जदार हा ग्रामीण भागातीलच असावा.

स्कूटर विथ ऍडॉप्शन चालवणे करता लाभार्थ्याकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना सुरु झाल्या असून लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करून जिल्हा परिषद योजना 2024 या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *