घरकुल योजना 2024 अपंग व्यक्तींना मिळणार विनाअट घरकुल अर्ज सुरु झाले अनुदान रक्कम 1 लाख 20 हजार रुपये

घरकुल योजना 2024 अपंग व्यक्तींना मिळणार विनाअट घरकुल अर्ज सुरु झाले अनुदान रक्कम 1 लाख 20 हजार रुपये

जाणून घेवूयात घरकुल योजना 2024 gharkul yojana संदर्भात सविस्तर माहिती.

तुम्हाला जर शासकीय अनुदानावर घरकुल हवे असेल तर त्यासाठी अर्ज सरू झालेले आहेत. विनाअट घरकुलासाठी १ लाख वीस हजार रुपये मिळणार आहेत.

या योजनेचा लाभ केवळ ग्रामीण भागातील नागरिकच घेवू शकतात. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळावे हा शासनाचा उद्देश आहे.

जिल्हा परिषद योजना 2024 सुरु 100 टक्के अनुदानावर मिळणार लॅपटॉप पिको फॉल शिलाई मशीन मिरची कांडप यंत्र घरकुल योजना

घरकुल योजना 2024 अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 जुलै

कोणत्या योजनेतून हे घरकुल मिळणार आहे. योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोणत्या व्यक्ती यासाठी पात्र असणार आहेत जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने हि योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

तुम्हाला देखील घरकुल योजनेसाठी शासकीय अनुदान हवे असेल तर तुमचा अर्ज पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करून द्या.

मिस्तरी कामगारांना मिळणार लाभ पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत 3 लाख रुपये mason worker scheme

कोठे करावा लागणार अर्ज कोणती लागणार कागदपत्रे

जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालयात हा घरकुल योजनेचा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

या योजनेसाठी केवळ अपंग व्यक्तीच अर्ज करू शकतात. तुम्ही जर दिव्यांग म्हणजेच अपंग असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो.

योजनेसाठी लागणारा अर्ज या लेखाच्या सर्वात शेवटी दिला आहे तो डाउनलोड करून घ्या जेणे करून तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येईल.

पात्र झाल्यावर अर्जदारास एक प्रस्ताव सादर करावा लागतो त्या सोबत जी  कागदपत्रे सादर करावी लागतात ती खालील प्रमाणे आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

अर्जावर अर्जदाराचा फोटो व्यवस्थित चिटकवून तो अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अर्जदार अपंग असल्याचे प्रमाणपत्र ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त. अपंग प्रमाणपत्र हे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने मिळालेले असणे गरजेचे आहे.

रहिवासी प्रमाणपत्र.

घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र.

अर्जदारांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्डची झेरॉक्स.

अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

अर्जदाराच्या स्वतःच्या नावाचा जागेचा दाखला ८ अ प्रमाणपत्र.

१ लाख रुपयाच्या आतील तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

घरकुल योजना 2024 अर्ज डाउनलोड करा

वरील प्रमाणे कागदपत्रे संबधित विभागास अर्जासोबत सादर करणे गरजेचे आहे. विनाअट घरकुल योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

वरील अर्ज डाउनलोड करून घ्या सविस्तर माहिती भरून 15 जुलै 2024 या तारखेच्या आत सादर करून द्या.

हि योजना सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु असते फक्त ज्या त्या जिल्ह्यांचा अर्ज स्वीकारण्याचा कालावधी मागेपुढे होऊ शकतो.

सध्या छत्रपती संभाजी नगर येथे अपंगासाठी घरकुल योजनेचे अर्ज स्वीकारणे सुरु आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये जेंव्हा अर्ज सुरु होईल किंवा कोणत्याही जिल्ह्यांमध्ये हे अर्ज सुरु होईल त्या वेळी आपणास आमच्या या वेबसाईट, फेसबुक, इंस्टाग्राम माध्यमांद्वारे कळविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *