झेरॉक्स मशीन योजना 2024 xerox machine yojana योजनेसाठी लागणारा अर्ज pdf मध्ये उपलब्ध.

झेरॉक्स मशीन योजना 2024 xerox machine yojana योजनेसाठी लागणारा अर्ज pdf मध्ये उपलब्ध.

झेरॉक्स मशीन योजना 2024 xerox machine yojana संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती.

समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरु झाल्या आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख 1 5 जुलै 2024 हि आहे.

मागासवर्गीय महिलांना हि झेरॉक्स मशीन अनुदानावर xerox machine yojana मिळणार असून यासाठी ४३०७० रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. १०० टक्के अनुदानावर हि योजना आहे.

जिल्हा परिषदेच्या २० टक्के उपकारांतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन दिले जाणार आहे.

सध्या हि योजना छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हि योजना सुरु असते. फक्त अर्ज करण्याचा कालावधी वेगळा असतो.

जिल्हा परिषद योजना 2024 सुरु 100 टक्के अनुदानावर मिळणार लॅपटॉप पिको फॉल शिलाई मशीन मिरची कांडप यंत्र घरकुल योजना

झेरॉक्स मशीन योजना 2024 मुळे बेरोजगारांना मिळेल रोजगार

तुम्ही जर बेरोजगार असाल आणि रोजगार निर्माण करायचा असेल तर हि योजना तुम्हाला हातभार लावू शकते.

तुम्हाला जर ऑनलाईन शॉप टाकायचे असेल किंवा इतर महत्वाच्या कामासाठी झेरॉक्स मशीन खूप गरजेचे असते.

मशीनचा खर्च ४३ हजार रुपये एवढा असल्याने हे मशीन घेणे परवडत नसल्याने अनेकांना आपला उद्योग उभा करण्यात अडचणी येते.

परंतु आता १०० टक्के अनुदांवर जिल्हा परिषद योजनेतून हे झेरॉक्स मशीन मिळणार असल्याने तुम्ही लगेच या योजनेसाठी अर्ज करू शकता.

अर्जाचा नमुना pdf मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून तो पंचायत समिती कार्यालयात सादर करून द्या.

खालील लिंकवर क्लिक करून झेरॉक्स मशीन मशीनचा अर्ज डाउनलोड करा.

कोण आणि कोठे करू शकाल झेरॉक्स मशीन 2024 योनेसाठी अर्ज

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने हि योजना राबविली जात असून तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे.

सादर योजना हि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेस मागासप्रवर्ग व नवबौद्ध या घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे.

तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला तुमच्या पंचायत समिती कार्यालयात सादर करायचा आहे.

योजनेसाठी लागणारी कागपत्रे

ग्रामसेवकांचा जागा संदर्भात प्रमाणपत्र.

अर्जदाराच्या जातीचे प्रमाणपत्र.

तहसीलदार यांचे उत्पनाचे प्रमाणपत्र १ लाख रुपयापर्यंतचे.

अर्जदाराचा दारिद्ररेषेचा दाखला.

ग्रामसेवक यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र.

योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.

शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र.

ग्रामसभेच्या ठरावाची झेरॉक्स प्रत.

अर्जदाराच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत.

पासबुक झेरोक्स प्रत.

झेरॉक्स व्यवसाय सरू करण्यासाठी लाईट असल्याबाबतचा ग्रामसेवकांचा दाखला.

अर्जदाराच्या मालकीच्या जागेचा नमुना नंबर ८ अ.

कागदपत्रे झेरॉक्स मशीन अनुदान अर्ज करतांना मुख्य अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *