महाराष्ट्रातील पात्र महिलांना 1500 रुपये महिना मिळणार असून या योजनेचा जी आर म्हणजेच शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.
20 ते 60 या वयोगटातील महिलांना शासनाच्या वतीने महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. कशी आहे हि योजना कोणते लागणार आहेत कागदपत्रे, अर्ज कोठे करावा लागणार हि आणि इतर महत्वही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
घरातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती जर कोणती असेल तर ती महिला होय. महिला आणि पुरुष यांच्या आर्थिक उत्पन्नाची तुलना केली तर कदाचित महिलांचे उत्पन्न पुरुषांच्या तुलनेत कमी असते.
का सुरु केली हि योजना खालील लिंकवर क्लिक करून माहिती जाणून घ्या.
महिलांचे उत्पन्न पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी तसेच कुटुंबांमधील महिलांची निर्णायक क्षमता वाढावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण हि योजना सुरु केली आहे.
या योजनेचा शासन निर्णय देखील शासनाने काढला आहे.
1500 रुपये महिना मिळणार लाभार्थी कोण
महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1500 रुपये महिना मिळणार पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला कोणत्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे.
तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला या योजनेसाठी पात्र असेल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेवू शकता.
जाणून घेवूयात काय आहे या योजनेची पात्रता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पात्रता
लाभार्थी महिला हि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा कमी असावे.
बँक खात्याला आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
लाभार्थ्याचे आधार कार्ड
लाभार्थी महाराष्ट्र राज्यात राहत असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र
सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य.
बँक पासबुकच्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स प्रत.
लाभार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
रेशन कार्ड.
योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
अर्ज कसा आणि कोठे कराल
सेतू सुविधा केंद्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करता येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
अर्ज ऑफलाईन करायचा असेल तर ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी येथे भेट देवून अर्ज सादर करून द्यावा लागेल.
अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत येथे लावण्यात येईल. लाभार्थी यादी प्रसिद्ध झाल्यापासून 5 दिवसाच्या आत त्यावर हरकती मागविता येईल.
अशा पद्धतीने 1500 रुपये महिना मिळणार असूनपत्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा.