लाडकी बहिण योजनेत मोठे बदल आता अनेक महिला होतील या योजनेसाठी पात्र पहा कोणते झाले बदल

लाडकी बहिण योजनेत मोठे बदल आता अनेक महिला होतील या योजनेसाठी पात्र पहा कोणते झाले बदल

लाडकी बहिण योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत mukyamantri ladki bahin yojana changed ज्यामुळे अनेक अपात्र महिलांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. जाणून घेवूयात कोणते झाले आहे बदल.

सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे. २८ जून रोजी जी आर काढून या योजनेची अंमलबजावणी कशी होईल या संदर्भात शासनच्या वतीने सूचना करण्यात आल्या होत्या.

परंतु ज्या पद्धतीने हि योजना राबविली जाणार होती त्या पद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. जसे ज्या महिलेकडे ५ एकर पेक्षा जास्त जमीन असेल अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील या आणि अजून काही अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या ज्यामुळे हि योजना वादात सापडली होती.

योजनेचा pdf अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

आता मात्र या योजनेत बदल करण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत कोणते बदल करण्यात आले आहेत.

लाडकी बहिण योजनेत मोठे बदल

योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी हा १५ जुलै २०२४ करण्यात आला होता यामध्य बदल करण्यात आला असून हा कालावधी आता ३१ ऑगस्ट २०२४ करण्यात आला आहे. म्हणजेच पात्र महिला आता त्यांचा अर्ज ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करू शकणार आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजना सुरु mukhyamantri ladki bahin yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते जर लाभार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर अशा परिस्थितीत पात्र महिला १. १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र. ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. ४. जन्म दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र सादर करू शकतात.

५ एकर शेतीची अट वगळली

सगळ्यात महत्वाची अट म्हणजे या योजनेसाठी ५ एकर क्षेत्रापेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांना लाभ मिळणार नव्हता. आता हि अट रद्द करण्यात आली आहे.

हि अट म्हणजे अनेक महिलांवर अन्याय केल्यासारखे होते. कारण बऱ्याच महिला अशा आहेत त्यांच्याकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे.

हि जमिनीची अट रद्द केली असल्याने खऱ्या अर्थाने महिलांना आता न्याय मिळाला आहे.

लाभार्थीची वयोमर्यादा यापूर्वी २१ ते ६० वर्षे होती ती आता बदलून २१ ते ६५ वर्षे करण्यात आली आहे.

जर एखादी महिला परराज्यातील असेल आणि त्या महिलेने महाराष्ट्रातील व्यक्तीशी लग्न केले असेल तर अशा वेळी त्या महिलेच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

उत्पन्नाचा दाखला सुद्धा रद्द

२.५ लक्ष उत्पन्नाचा दाखला नसेल तर अशावेळी केवळ पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल तर ते ग्राह्य धरले जाणार आहे.

कुटुंबातील महिला अविवाहित असेल तर अशा एका महिलेस या योजनेचा लाभ दिला जाईल.

माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर GR आला

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी वेळ आणि पैसा देखील वाया जात होता. आता हि अट रद्द करून या पर्याय दिल्याने या योजनेचा लाभ मिळविणे खूप सोपे झाले आहे.

अशा प्रकारे लाडकी बहिण योजनेत मोठे बदल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *