लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज असा करा तुमच्या मोबाईलवरून mukhyamantri ladki bahin yojana online application process.

लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज असा करा तुमच्या मोबाईलवरून mukhyamantri ladki bahin yojana online application process.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात सविस्तर माहिती आपण या या ठिकाणी पाहणार आहोत जेणे करून हा अर्ज तुम्हाला स्वतःला सुद्धा करता येणार आहे.

अनेक जन मुख्यमंत्री बहिण योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात विचारणा करत होते. तालुक्याच्या जावून या योजनेच्या परीपुर्त्तेसाठी कागदपत्रे गोळा करताना दिसत आहेत.

या पेजच्या सर्वात खाली व्हिडीओ दिलेला. लाईव्ह पहा मुख्यमंत्री योजनेचा अर्ज मोबाईलवरून कसा केला जातो.

ऑनलाईन अर्ज सुरु करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा.

आधार कार्ड

अधिवास जन्मपत्र या कागदपत्रांसाठी १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला हे कागदपत्रे जरी असतील तरी चालते.

उत्पन्न प्रमाणपत्र – हि अट सुद्धा शासनाने शिथिल केली असून त्या एवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड सुद्धा अपलोड करता येते.

हमीपत्र.

बँक पासबुक. इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

अर्जदाराचा फोटो हा प्रत्यक्ष काढावा लागणार आहे.

1500 रुपये महिना मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर GR आला

लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज कि ऑफलाईन अर्ज करावा

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्जाचा नमुना डाउनलोड करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्जाचा नमून pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

pdf अर्ज डाउनलोड

वरील अर्ज डाउनलोड केल्यावर प्रिंट काढून घ्या आणि त्यामध्ये सविस्तर माहिती भरून अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांच्याकडे सादर करून द्या.

लाडकी बहिण योजना ऑनलाईन कसा करावा

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टाल करावे लागणार आहे. त्यानंतर जी पुढील प्रोसेस आहे ती खालील प्रमाणे आहे.

गुगल प्ले स्टोअरवरून  Narishakti Doot App तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल करा केवळ १०.४० एमबीचे हे app आहे.

नारी शक्ती दूत app ओपन करा.

इतर माहिती या ठिकाणी तुम्हाल दिसेल ती वाचून घ्या आणि स्किप करा.

नारी शक्ती दूत Narishakti Doot App लॉगीन करण्याची पद्धत

लाभार्थीने दिलेल्या चौकटीमध्ये त्यांच्या सक्रीय नंबर टाकावा.

टर्म आणि कंडीशन्स स्वीकारा.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजना सुरु mukhyamantri ladki bahin yojana

मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाकून otp verify करा.

अशा पद्धतीने तुम्ही आता नारी शक्ती दूत app मध्ये लॉगीन झालेले आहात.

नारी शक्ती दूत फ्रोफाईल अपडेट करा

प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही सूचना येतील त्या allow करायचा आहेत. त्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा अशी लिंक दिसेल त्यावर टच करा.

प्रोफाईल अपडेट करण्यासाठी लाभार्थीचे पूर्ण नाव टाईप करा.

इमेल आयडी टाका.

तुमचा जिल्हा निवडा.

तालुका निवडा

नारी शक्ती प्रकार निवडा. नारी शक्ती प्रकारामध्ये विविध पर्याय तुम्हाला दिसतील यामध्ये तुम्ही जर सर्वसाधारण महिला असेल तर गृहिणी हा प्रकार निवडा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शासनाकडून मिळेल 3000 रुपये Mukhyamantri vayoshri yojana

सर्वात शेवटी अपडेट करा.

अशा पद्धतीने आता प्रोफाईल अपडेट झाले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हमीपत्र डाउनलोड करा.

आता तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असून तुम्हाला डायरेक्ट आता अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कोठे आहे हे शोधायचे आहे.

हा अर्ज सादर करण्यासाठी काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात यामध्ये हमीपत्र हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. हे कागदपत्र अपलोड केल्याशिवाय हा अर्ज करता येणार नाही म्हणून सगळ्यात आधी हमीपत्र डाउनलोड करून घ्या.

त्यासाठी appच्या खालील bottom बारवर दिसत असलेल्या योजना या पर्यायावर टच करा.

pdf अर्ज आणि हमीपत्र असे दोन पर्याय दिसतील त्यावर टच करून अर्ज आणि हमीपत्र डाउनलोड करून घ्या. हमीपत्र डाउनलोड करणे गरजेचे आहे.

माझी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा

सगळ्यात आधी हि योजना या app मध्ये सोधायची कशी तर app च्या bottam पट्टीवर नारीशक्ती दूत असा होमचा पर्याय दिसेल त्यावर टच करा.

या ठिकाणी तुम्हाला माझी लाडकी बहिण योजना असा पर्याय दिसेल त्यावर टच करा.

आता अर्ज ओपन होईल त्यामध्ये माहिती भरण्यास सुरुवात करा.

अर्जामध्ये कशा पद्धतीने माहिती भरावी लागणार आहे, कोणकोणती माहिती भरणे गरजेचे आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

अशा पद्धतीने तुम्ही अगदी घरच्या घरी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज तुमच्या मोबाईलवरून करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *