लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाहीतर अर्ज होऊ शकतो बाद शासनाच्या नवीन सूचना

लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाहीतर अर्ज होऊ शकतो बाद शासनाच्या नवीन सूचना

जाणून घेवूयात लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे कशी अपलोड करावी या संदर्भातील शासनाच्या सूचना काय आहेत.

लाडकी बहिण योजना अंतर्गत १५०० रुपये महिना मिळणार असल्याने अनेकजन घाईघाईने अर्ज सादर करून देत आहेत. परंतु अर्ज सादर करतांना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती कशी केली पाहिजे या संदर्भात शासनाच्या नवीन सूचना आल्या आहेत.

बऱ्याचवेळा कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली जातात अशावेळी असे अर्ज बाद होण्याची शक्यता असते.

लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना

आधार कार्डची प्रत दोन्ही बाजूने स्कॅन करून अपलोड करावी.  

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल  तर अशावेळी अर्जदाराचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड,  शाळा सोडल्याची टीसी किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र अपलोड करावे.

अर्जदार महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल आणि त्या महिलेने महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर अशा परिस्थितीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे.

सविस्तर माहितीचा खालील व्हिडीओ पहा

२.५० लाखाच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्र  अपलोड करावे नसेल तर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर अर्जदार उत्पनाच्या एवजी हे कार्ड देखील स्कॅन करून अपलोड करू शकतात.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज करतांना बँक पासबुक स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही फक्त बँक खात्यासंदर्भातील माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे.

कागदपत्रे अपलोड करतांना ह्या चुका ताळा. नाहीतर होईल अर्ज रद्द

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणे खूप कठीण झाले आहे कधी app चालत नाही तर कधी वेळ मिळत नाही. एवढे कष्ट करून देखील तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि तो चुकीचा असेल तर तुम्हाला खूप पश्चाताप होऊ शकतो.

खालील पद्धतीने फोटो अपलोड करा.

आधार कार्ड अपलोड करतांना अनेकजण एकाच बाजूचा फोटो काढून अपलोड करण्याची शक्यता असते कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही.

त्यामुळे केवळ पुढच्या बाजूचा फोटो कडून जर तुम्ही अपलोड केले तर अशावेळी तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन्ही बाजूचे करा कागदपत्रे अपलोड

असे न करता आधार कार्डचा दोन्ही बाजूचे दोन फोटो काढून घ्या आणि हे दोन फोटो एकत्र जोडून एकदाच अपलोड करा.

मतदान कार्ड सुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करा पुढचा फोटो आणि मागील बाजूचा फोटो एकत्र जोडून घ्या आणि अपलोड करा.

राशन कार्डचे सुद्धा पहिल्या पानाचा फोटो आणि मागील पानाचा फोटो असे दोन फोटो काढून घ्या एकत्र जोडा आणि दोन्हीचा एकच फोटो अपलोड करा.

कोणत्याही कागदपत्राचे दोन फोटो काढायचे असतील तर ते एकाच फोटोमध्ये जोडून अपलोड करायचे आहेत हे लक्षात असू द्या.

योजनेचे अर्ज करण्यासाठी कोणतीही नवीन वेबसाईट नाही नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार अर्ज

मध्यंतरी समाज माध्यमांवर संदेश फिरत होता कि सद्या लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्याही घाई करू नका कारण १० जुलै २०२४ नंतर हे अर्ज सादर करण्यासाठी नवीन वेबसाईट येणार आहे. त्यामुळे बऱ्याच महिलांनी हे अर्ज भरण्याचे थांबविले होते.

आता मात्र हे निश्चीत झाले आहे कि माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज हा नारी शक्ती दूत ॲपवरून कोणत्याही महिलांना सादर करता येणार आहे.

त्यामुळे तुम्ही अजूनही तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज सादर केला नसेल तर लगेच सादर करून द्या.

अधिकृत माहिती पहा

असा करा लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज

लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिला स्वत: अर्ज करू शकता. अर्ज अगदी मोबाईलवरून देखील करता येतो.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा.

खालील बटनावर क्लिक केल्यास nari Shakti doot app वापरून लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे.

अशा पद्धतीने लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे कशी सादर करावीत या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *