मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जात व योजनेत झाले बदल नवीन GR आला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जात व योजनेत झाले बदल नवीन GR आला.

लाडकी बहिण ऑनलाईन अर्ज व योजनेत असे दोन्ही बदल झालेले आहेत जाणून घेवूयात सविस्तर माहिती. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जे बदल झाले आहेत त्या संदर्भात शासनाचा नवीन जी आर आला आहे.

जी आर नुसार योजनेमध्ये अनेक बदल झालेले आहेत.

नारी शक्ती दुत ॲपद्वारे माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला हे ॲप खूप हँग होत होते.

ॲप ओपन होण्यास आणि otp येण्यास खूप वेळ लागत होता त्याचप्रमाणे उपलोड करावी लागणारी कागदपत्रे १ एमबी पेक्षा जास्त असतील तर ती अपलोड होत नव्हती त्यामुळे नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत होता.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शासनाकडून मिळेल 3000 रुपये Mukhyamantri vayoshri yojana 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जामध्ये आता बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अनेकांना अर्ज करतांना अडचणी येत होत्या त्या आता या बदलामुळे येणार नाहीत. जाणून घेवूयात कोणते ५ प्रकारचे बदल मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन अर्जामध्ये करण्यात आले आहेत.

लाडकी बहिण ऑनलाईन अर्जात झाले 5 बदल

नारीशक्ती दूत ॲप सुरळीत चालावे यासाठी काही महत्वाचे बदल शासनाने या अर्जामध्ये केलेले आहे ते बदल खालील प्रमाणे आहेत.

महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हा पर्याय नवीन समाविष्ट करण्यात आलेला आहे.

अर्ज करतांना अर्जदाराचा पत्ता असा शब्द होता तो बदलून आता अर्जदाराचा पत्ता आधारकार्ड प्रमाणे व इतर माहिती असा करण्यात आला आहे.

महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का? पर्याय ॲप अपडेट करण्यापूर्वी नव्हता आता तो नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजना सुरु mukhyamantri ladki bahin yojana

ॲप अपडेट करण्यापूर्वी कागदपत्रे अपलोड करण्याची साईज १ एमबी होती ती आता ५ एमबी करण्यात आली आहे.

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र अपलोड करण्याचा नवीन पर्याय आता आला आहे.

अशा प्रकारचे बदल आता नारीशक्ती दुत ॲपमध्ये करण्यात आले असल्याने हे नारीशक्ती दूत ॲप नागरिकांना अपडेट करून घ्यावे लगणार आहे.

लाडकी बहिण योजनेत झाला बदल पहा जीआर GR

ज्या प्रमाणे ऑनलाईन अर्जात बदल झाला असून त्याच प्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत देखील बदल करण्यात आला आहे.

या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे एखाद्या महिलेचा नवीन विवाह झाला असेल तर अशावेळी त्या महिलेचे नाव राशनमध्ये येण्यास वेळ लागतो अशावेळी अशी महिला उत्पन्नाचा दाखला म्हणून तिच्या पतीचे राशनकार्ड वापरू शकते.

महिलेचा फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष महिला हजार असणे अनिवार्य नाही अशावेळी ऑफलाईन अर्जावरील महिलेच्या फोटोचा फोटो काढून अपलोड करता येईल.

या प्रकारचे अजून अनेक बदल झाले असून यासाठी तुम्ही सविस्तर माहितीचा खालील जी आर म्हणजेच शासन निर्णय पाहून घ्या त्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज आता मोबाईलद्वारे देखील करता येणार

लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज करतांना अडचणी येत होत्या. हे नारीशक्ती दूत ॲप आता अपडेट करण्यात आले असून अर्ज करतांना आता अडचण येत नाही.

नारीशक्ती दूत ॲपद्वारे कोणत्याही महिलांना करता येणार आहे. तुमच्या मोबाईल मधील नारीशक्ती दूत ॲप ओपन करून तुम्ही देखील हा अर्ज ऑनलाईन करू शकता.

तुम्हाला जर माहित नसेल कि नारीशक्ती दूत ॲपचा उपयोग करून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा करावा लागतो तर त्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

अशा प्रकारे लाडकी बहिण अर्जात बदल झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *