लाडक्या बहिणीसाठी पैसे आले पहा संपूर्ण माहिती.
लाडकी बहिण योजनेसाठी निधी आला असून आता लवकरच हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.
तुम्ही जर लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला असेल तर आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत.
लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा केली जाणार आहे.
पुणे येथे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये हि माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री यांनी दिली आहे.
अनेकांना होता या योजनेविषयी संभ्रम
लाडकी बहिण हि योजना महाराष्ट्रामध्ये एवढी लोकप्रिय झाली असून मागील १० ते १५ दिवसापासून केवळ याच योजनेची चर्चा सुरु आहे.
पात्र महिला कागदपत्रे गोळा करतांना दिसत आहेत तर सेतू सुविधा केंद्रावर अर्ज भरण्यासाठी रांगच रांग लागत आहे.
हि योजना अंमलात कधी येईल आणि योजनेचे पैसे खात्यामध्ये केंव्हा येईल या संदर्भात उत्सुकता लागलेली होती.
आता मात्र पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे ठाकण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
घरातील दोन महिलांना मिळणार लाभ
लाडकी बहिण योजनेसाठी घरातील दोन महिला पात्र ठरणार आहेत. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज देखील करता येतो.
योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने महिलांकडून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पैसे घेऊ नयेत असे आदेश शासकीय स्तरावरून काढण्यात आले आहेत.
तरी देखील काही ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पैसे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशावेळी तुम्ही तुम्ही स्वतः अर्ज करू शकता. माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या कि मोबाईलचा उपयोग करून माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो.