बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शासनाच्या वतीने शिष्यवृत्तीसाठी अनुदान दिले जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा आणि कागदपत्रे कशी अपलोड करावीत जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
तर या संदर्भात अगदी सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शिवाय या पेजच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देखील दिलेला आहे. तो व्हिडीओ पाहून देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. हि संपूर्ण प्रोसेस अगदी तपशीलवारपणे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana
किती मिळेल शिष्यवृत्ती अनुदान
1 ली ते 7 वी बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना 2500 रुपये मिळतात.
8 वी ते 10 वी – 5000 रुपये.
10 वी ते 12 – 10,000 रुपये पण मार्क 50 टक्के पेक्षा जास्त पाहिजे.
1 st year, second year and 3rd – 20 हजार रुपये अनुदान
Diploma – 20000.
Degree – 25000.
Medical degree – 1 lakh.
engineering – 60,000.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा व महत्वाचे कागदपत्र मोफत pdf मध्ये डाउनलोड करून घ्या.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान शिष्यवृत्तीसाठी लागणारी 5 कागदपत्रे
जेंव्हा तुम्ही बांधकाम कामगार योजेनेच्या वेबसाईटवर लॉगीन करता त्यावेळी ज्या इयत्तेतील विद्यार्थ्याचा तुम्हाला अर्ज करायचा असेल त्यावेळी त्या त्या इयत्तेनुसार कागदपत्रे वेगवेगळी असू शकतात.
उदाहरण म्हणून या ठिकाणी इयत्ता 11 वी किंवा 12 वी मध्ये शिकत असलेल्या मुलाच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा झाल्यास त्यासाठी कोणती कागदपत्रे लागता हे जाणून घेवूयात.
इयत्ता 10 वी अथवा इयत्ता 12 वी मध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळाल्याची गुणपत्रिका
विद्यालयाचे ओळखपत्र पण हे कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य नाही.
चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
पाल्याचे आधार कार्ड.
राशन कार्ड.
कसा करावा ऑनलाईन अर्ज
बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाईन अर्ज अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. मोबाईलवरून हा अर्ज जी प्रोसेस आहे ती खालीलप्रमाणे आहे.
सगळ्यात आधी बांधकाम कामगार नोंदणी झाल्याचे तुमच्याकडे नोंदणी क्रमांक असायला हवा.
नोंदणी क्रमांक व मोबाईल नंबर टाकून मोबाईलवर otp मिळवा.
मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाकून लॉगीन करा.
लॉगीन केल्यावर अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील अगदी तपशीलवार माहितीचा व्हिडीओ आम्ही खास करून तुमच्यासाठी बनविलेला आहे.
खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान योजेंचा अर्ज तुमच्या मोबाईलवरून सादर करून द्या.