जाणून घेवूयात 10 लाख रुपये अनुदान संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय
अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक या खूप महत्वाची भूमिका बजावत असतात कामाच्या तुलनेत जर बघितले तर त्यांना मानधन खूपच कमी असते.
लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाहीतर अर्ज होऊ शकतो बाद शासनाच्या नवीन सूचना
10 व 5 लाख रुपये मिळणार
मात्र आता उल्लेख केलेल्या सर्वाना १० लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळणार आहे. जाणून घेवूयात या अनुदानाचे स्वरूप कसे असणार आहे.
अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अशा प्रकारचे अनुदान मिळणार आहे.
राज्यामध्ये सध्या 75,578 अशा स्वयंसेविका आहेत तर 3622 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. गटप्रवर्तक आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. हि सर्व कामे करताना जर अशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर अशावेळी त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी 10 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.