जाणून घेवूयात बांधकाम कामगार भांडे bandhkam kamgar bhande yojana
शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणत मजूर बांधकाम कामगार म्हणून काम करतात. बांधकाम करत असतांना त्यांना एका स्थळावरून दुसऱ्या स्थळावर स्थलांतर करावे लागते.
अशावेळी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे भांडी अशा मजुरांना त्या ठिकाणी खरेदी करावी लागतात. परंतु तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला आता शासनाकडून मोफत भांडी मिळणार आहे.
बांधकाम कामगार भांडी योजनेचा अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिला आहे तो नक्की पहा आणि त्याप्रमाणे तुमचा अर्ज सादर करून द्या.
बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
त्यामुळे हि माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
काय आहे हि बांधकाम कामगार भांडे योजना
शासनाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना भांडी संच पुरविण्यात येतो. यामध्ये ३० प्रकारची भांडी असतात. या संदर्भात शासकीय जीआर देखील आलेला आहे.
बांधकाम कामगार योजना अंतर्गत बऱ्याच कामगारांना भांडी संच योजना संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते.
परंतु तुम्हाला जर अजूनही या योजने संदर्भात माहिती नसेल तर जे बांधकाम कामगार नोंदीत आहेत म्हणजे ज्यांनी बांधकाम कामगार नोंदणी केली आहे अशा बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत भांडी संच देण्यात येतो.
बांधकाम भांडे बॉक्समध्ये कोणकोणते भांडे असतात त्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी होऊ शकते तुमची आर्थिक पिळवणूक
मीण भागातील कामगारांना भांडी संच योजेंचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा या संदर्भात माहिती नसल्याने अनेक मध्यस्थ त्याची आर्थिक पिळवणूक करण्याची शक्यता असते.
काही ठिकाणी जास्त पैसे घेवून कामगारांना मोफत भांडी संच योजनेचा लाभ मिळवून दिला जातो. पैसे देवूनही काही बांधकाम कामगारांना भांडे संच पूर्ण मिळत नसल्याचे अनेक उदाहरणे सामोरे आले आहेत.
यासाठी तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला बांधकाम कामगार भांडी संच योजना ज्याला ग्रामीण भागामध्ये संसार बाटली असे सुद्धा म्हणतात. तर या योजना अंतर्गत किती भांडे मिळतात याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.
शासनाच्या जीआरमध्ये दिली आहे सविस्तर माहिती
कोणतीही योजना राबवायची असेल तर त्यासाठी शासन एक जीआर काढते आणि त्यानुसर ती योजना राबविली जाते.
तर भांडी योजनेचा म्हणजेच संसार बाटली किंवा ज्याला गृहपयोगी साहित्य असे देखील म्हणतात तर या योजेंचा देखील जी आर शासनाने काढलेला आहे.
बांधकाम कामगार भांडी योजना म्हणजेज गृहपयोगी भांडी योजना किंवा संसार बाटली योजना कशी राबवावी या संदर्भात शासनाने काही निर्देश दिले आहेत.
हा जी आर तुम्ही डाउनलोड करून घ्या जेणे करून तुम्हाला समजेल कि तुम्हाल कोणकोणती भांडी मिळायला पाहिजे.
बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार भांडे योजनेचा जीआर डाउनलोड करा
कधी कधी मध्यस्थ व्यक्ती तुम्हाला कमी भांडी देऊ शकतात अशावेळी तुमच्याकडे जर हा शासनाचा जी आर असेल तर तुम्ही भांडे घेतांना त्याची शहानिशा करू शकतात.
जर तुम्हाला भांडे संचामध्ये काही भांडी कमी असल्याचे निर्देशनास आले तर अशावेळी या जीआरचे साह्य घेवून तुम्ही त्या विषयी संबधित व्यक्तींना दाद मागु शकता.
तुम्हाला जर हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करू शकता.
वरील लिंकवर क्लिक करून हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि बघा जीआर मध्ये कोणकोणती भांडी बांधकाम कामगारांना मिळणार आहेत तर भांडी तुम्हाला मिळाली आहेत का याची खात्री करून घ्या.
कसा करावा भांडी योजनेसाठी अर्ज
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कार्यालय असते ज्याला wfc office असे म्हणतात. बांधकाम कामगार भांडी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाल एक अर्ज या wfc office मध्ये करावा लागतो.
या अर्जाचा नमुना ओरीजनल pdf मध्ये हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून हा नमुना डाउनलोड करून घ्या.
वरील लिंकवर क्लिक करून हा अर्ज डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार कार्यालयात सादर करून द्या.
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ती ती खालील प्रमाणे.
पासपोर्ट फोटो.
बँक पासबुक झेरॉक्स.
राशन कार्ड झेरॉक्स.
लेबर कार्ड झेरॉक्स.
१ रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स
आधार कार्डची झेरॉक्स
बांधकाम कामगार भांडे योजनेचा अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे तुमचा अर्ज सादर करून द्या.