लाडकी बहिण योजनेचा चुकीचा अर्ज सादर झाला असेल तर दुरुस्त कसा करायचा पहा संपूर्ण माहिती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत.
योजनेमध्ये वेळोवेळी बदल होत गेल्याने अनेकांना या योजनेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. यामध्ये काहींनी घाईने अर्ज केल्याने अर्ज कसा करावा या संदर्भात सखोल माहिती नसल्याने चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे अपलोड करण्याची शक्यता निर्माण झाली होती.
तुम्ही केलेले लाडकी बहिण योजनेचा अर्ज बरोबर आहे का, सर्व कागदपत्रे शासनाने सांगितल्याप्रमाणे अपलोड केली आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
तुम्ही जर चुकीचा अर्ज सादर केला असेल तर तो रद्द होऊ शकता परंतु घाबरण्याचे कारण नाही यासाठी शासन तुम्हाला अर्ज दुरुस्त करण्याची एक संधी देत आहे.
खालील योजना पण पहा.
लाडकी बहिण योजनेचा चुकीचा अर्ज होणार रद्द
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत शासकीय सूचनाप्रमाणे आधार कार्ड, राशन कार्ड यांचे दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज बऱ्याच वेळेस घाईगरबडीत सादर केल्याने अर्ज सादर करतांना अनेकदा आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा राशन कार्ड असेल तर या कागदपत्रांची एकच बाजू काही जणांनी अपलोड केलेली आहे.
त्यामुळे तुम्ही जर तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज करत असतांना अशी चूक केली असेल तर तुमचा हा अर्ज रद्द होऊ शकतो.
अर्ज रद्द होण्याच्या अगोदर म्हणजेच अर्ज पेंडिंगमध्ये असतांना तो दुरुस्त करून घ्या. कारण अर्ज एडीट करण्याचा नवीन पर्याय आता आलेला आहे.
खालील योजना पण पहा.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान योजना labor construction worker scholarship grant
नारी शक्ती दूत ॲप अपडेट केल्यावर करता येईल अर्जाची दुरुस्ती
लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप Nari Shakti doot app द्वारे सादर केले जात आहेत.
नारी शक्ती दूत ॲप अपडेट केल्यावर तुम्ही तुमचा चुकीचा अर्ज दुरुस्त करू शकता. यामध्ये प्रामुख्याने कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड होऊ शकतात.
असे झाले असेल किंवा अर्ज करतांना काही चूक झाली असेल तर असा अर्ज दुरुस्त करता येतो. अर्ज दुरुस्त करतांना काळजीपूर्वक माहिती सादर करा कारण हा अर्ज एकदाच अपडेट करता येतो परत पुन्हा करता येत नाही.
अर्ज दुरुस्तीचा खालील लाइव डेमो पहा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज दुरुस्त करायचा असेल म्हणजेच अपडेट करायचा असेल तर तो कसा केला जातो या संदर्भातील सविस्तर माहितीचा लाइव डेमो व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी तयार केला आहे.
खालील व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे तुमच्या अर्जामध्ये दुरुस्ती करून घ्या. अशा पद्दतीने तुम्ही लाडकी बहिण योजनेचा चुकीचा अर्ज दुरुस्त करू शकता.