जिल्हानिहाय नुकसानभरपाई यादी संदर्भातील जी आर आला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच निधी जमा होणार आहे.
राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते.
या अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानी पोटी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे.
खालील माहिती पण कामाची आहे.
लाडकी बहिण लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड Ladki bahin labharthi list download
नुकसानभरपाईसाठी 596 कोटी निधी आला
या संदर्भात शासनाने जी आर देखील निर्गमित केला आहे. एकूण 596 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
ज्या शेतकऱ्यांना हि मदत मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी या जी आर सोबत जोडण्यात आली आहे. ३ हेक्टर जमीन क्षेत्र मर्यादेत हि मदत करण्यात येणार आहे.
हि नुकसानभरपाईची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये dbt पद्धतीने ट्रान्स्फर केली जाणार आहे.
जिल्हानिहाय नुकसानभरपाई यादी खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत
अहमदनगर.
नाशिक.
धुळे.
जळगाव.
सोलापूर.
पुणे.
अमरावती.
अकोला.
यवतमाळ.
बुलढाणा.
वाशीम.
गोंदिया.
नागपूर.
भंडारा.
चंद्रपूर.
गडचिरोली.
या संदर्भातील सविस्तर माहितीचा जी आर बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.