लाडक्या बहिणीचे पैसे आले नसेल तर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे का ते ऑनलाईन कसे पाहावे जाणून घेवूयास्त या संदर्भातील सविस्तर माहिती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले होते. तुमचा अर्ज जर चुकला असेल तर तो दुरुस्त करण्यासठी एडीटफॉर्म देखील देण्यात आला होता.
त्यानुसार ज्या महिलांचे अर्ज सदर करतांना माहिती चुकली होती किंवा कागदपत्रे अपलोड करतांना चुकीचे कागदपत्रे अपलोड केली गेली होती अशा महिलांनी हे सर्व अर्ज दुरुस्त करून पुन्हा अपलोड केले आहेत.
या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता ३ हजार रुपये जमा झालेले आहेत. परंतु काही महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत.
लाडकी बहिण लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड Ladki bahin labharthi list download
अर्ज मंजूर होऊनही पैसे बँकेत जमा झाले नाहीत
बऱ्याच महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर झाले असल्याचे संदेश आले आहेत. परंतु तरी देखील तुंच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे बऱ्याच महिलांना टेन्शन आले आहे.
परंतु यासठी काळजी करण्याचे काही कारण नाही.
तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर पटकन तुमचा मोबाईल उचला आणि तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही ते तपासून पहा.
कसे तपासाल तुमचा आधार बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळविण्यासाठी तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे अर्थात आधार बँक सीडिंग होणे गरजेचे आहे.
आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी पटकन तुमचा मोबाईल उचला आणि मोबाईल मधील गुगलच्या सर्चबारमध्ये myaadhaar.uidai.gov.in हा वेब adress टाका.
आधारच्या अधिकृत वेबसाईटवर चेक करता येईल बँक लिंकिंग स्टेट्स
डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
माय आधार myaadhaar हि वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला Bank seeding status हा पर्याय शोधायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
तुमचा आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकून प्रोसिड या बटनावर टच करताच तुमचे आधार बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला कळेल.
वेबसाईटमध्ये काही तांत्रिक अडचण असेल तर परत पुन्हा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणीचे पैसे आले नसेल तर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे जाणून घेवू शकता.