2 हजार रुपयांचा हफ्ता या दिवशी जमा होणार Namo shetkari yojana

2 हजार रुपयांचा हफ्ता या दिवशी जमा होणार Namo shetkari yojana

पहा कोणत्या दिवशी 2 हजार रुपयांचा हफ्ता जमा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती.

केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

अगदी याच योजना प्रमाणे महाराष्ट्र शासनाने सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी हि योजना सुरु केली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या थ्या हफ्त्याच्या निधी संदर्भातील जी आर काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी काढण्यात आला.

निधी तर आला आता हेज पैसे बँकेत कधी जमा होईल या संदर्भात शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला का असे तपासा pm vishwkarma scheme status check online

नमो शेतकरी महासन्मान निधी वितरीत करण्याचा जी आर

शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी वितरीत करण्याचा जी आर नुकताच काढलेला आहे. हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी वितरीत होईल.

खात्रीशीर माहितीनुसार पुढील दोन दिवसात हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी या नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र असणार आहेत.

2 हजार रुपयांचा हफ्ता मिळणार किती शेतकऱ्यांना होणार लाभ

राज्यातील जवळपास 90 लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हफ्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत.

पीएम किसान सन्मान निधीसाठी राज्यातील 90 लाख 50 हजार शेतकरी पात्र ठरलेले होते यातील काही शेतकऱ्यांना 14 व्या हफ्त्याचे देखील पैसे आल्याने असे शेतकरी नमो शेतकरी महा सन्मान निधीच्या 3 ऱ्या हफ्त्यापासून वंचित राहिले होते.

त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार आहे.

5 वा हफ्ता देखील लवकरच मिळणार

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ५ वा हफ्ता देखील लवकरच मिळणार. कृषी विभाग 4 था आणि 5 वा हफ्ता देखील वितरीत करण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु वित्त विभागाने केवळ एकच हफ्ता वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.

आगामी विधानसभेसाठी आदर्श आचार संहिता लवकरच लागू होणार असल्याने शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधीचा हफ्ता देखील आचार साहिंता लागण्याचा आत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

आगामी दिवस हे सणासुदीचे आहेत यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हफ्ते मिळणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातवर निर्माण झाले आहे.

लक्षात असू द्या कि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हफ्त मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील हफ्ता दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *