NPCI pdf form download लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे खात्यात जमा नाही हा फॉर्म बँकेत सादर करा

NPCI pdf form download लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे खात्यात जमा नाही हा फॉर्म बँकेत सादर करा

NPCI pdf form download करून बँकेत सादर केल्यावर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होते आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार आहे.

जाणून घेवूयात NPCI form संदर्भातील सविस्तर माहिती.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज जर चुकला असेल तर तो दुरुस्त करता येतो परंतु अर्ज मंजूर होईन देखील पैसे जर बँक खात्यात आले नाहीत तर मात्र टेन्शन वाढते.

या लेखामध्ये npci form pdf download करण्याची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्या.

अशावेळी निराश होण्याची गरज नाही. कारण लाडकी बहिण योजनेचा तुमचा अर्ज जरी मंजूर झाला असला तरी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

NPCI form बँकेत सादर करणे गरजेचे

NPCI आधार सीडिंग संदर्भातील प्रोसेस कशी असते हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. एवढेच नव्हे तर NPCI pdf form download लिंक देखील या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हा NPCI pdf form डाउनलोड करून प्रिंट करायचा आहे.

प्रिंट केल्यानंतर तुमच्या बँक शाखेत जमा करून द्यायचा आहे हि सर्व प्रोसेस अगदी सविस्तरपणे समजून घेवूयात जेणे करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अडकलेले ३ हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

लाडकी बहिण लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड Ladki bahin labharthi list download

NPCI pdf form download करा

बऱ्याच वेळेस शासनामार्फत जे पैसे येतात ते DBT पद्धतीने म्हणजेच Direct Benefit Transfer पद्धतीने पाठविले जातात.

जेंव्हा हे पैसे पाठविले जातात तेंव्हा ते ज्या बँक खात्याला NPCI सीडिंग आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात.

बऱ्याच वेळेस असा समज होतो कि आपले जे आधार कार्ड आहे हे सगळ्याच बँक खात्यांना लिंक आहे परंतु तसे नसते.

कोणत्याही एका बँक खात्याला हे NPCI आधार लिंक होत असते आणि त्याच बँक खात्यामध्ये शासकीय अनुदानाचे पैसे जमा होत असतात.

त्यामुळे खालील बटनावर क्लिक करून NPCI pdf form download करून घ्या. प्रिंट करा त्यामध्ये योग्य ती माहिती सादर करा आणि तुमच्या बँक शाकेत सादर करून द्या.

259 KB

NPCI form सोबत कोणकोणते कागदपत्रे जोडाल

वरील लिंकवर क्लिक करून हा अर्ज डाउनलोड केल्यावर तो व्यवस्थित प्रिंट करून घ्या. या NPCI form वर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा चिटकवीने आवश्यक आहे. तुमच्या बँक शाखेत हा अर्ज सादर करतेवेळी या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडा.

आधार कार्डची झेरॉक्स प्रत.

बँक पासबुकची झेरॉक्स.

हि कागदपत्रे अर्जासोबत जोडून द्या.

NPCI form मध्ये खालील माहिती भरावी लागणार आहे.

बँकेचे नाव.

बँक शाखेचे नाव.

तुमचा खाते क्रमांक.

खातेदार यांची सही.

खातेदाराचे नाव.

खातेदाराचा मोबाईल नंबर इमेल आयडी या संदर्भातील माहिती.

अशा पद्दतीने तुम्ही NPCI form बँकेत सादर करून तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करू शकता व लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळवू शकता.

सविस्तर माहितीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *