राज्य आणि केंद्र शासनाच्या या शेतकरी योजनांचा लाभ घेतला का

राज्य आणि केंद्र शासनाच्या या शेतकरी योजनांचा लाभ घेतला का

केंद्र आणि राज्य शासन शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवीत असते परंतु अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने या योजना संदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या डिजिटल डीजी वेबसाईटवर देत आलेलो आहोत.

देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा असल्याने केंद्र शासनाने महाराष्ट्र फर्स्ट धोरणाने शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी १३ हजार कोटींच्या अनेक योजना जाहीर केल्या आहेत.

यामध्ये मग शेतकरी सन्मान निधी असेल, फळबाग योजना असतील, सूक्षम सिंचन, शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध अशा विविध योजना केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी दिलेल्या आहेत.

नमो शेतकरी योजना हफ्ता मिळाला नाही. का मिळत नाही हफ्ता असे शोधा कारण namo shetkari sanman yojana 2023

लगेच मिळणार शेतकऱ्यांना कर्ज

अवघ्या वीज मिनिटांमध्ये यापुढे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना देखील राज्यसरकारने हाती घेतलेली आहे. एवढेच नव्हे तर सुधारित बियाणे खते औषधी इत्यादी शासकीय अनुदानावर उपब्ध करून दिलेल्या आहेत.

एवढेच नव्हे तर शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर कृषी पंप योजना देखील राबविण्यात येत आहे. या योजनांचा देखील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाभ घेतला असून त्यांना आता दिवसा वीज उपलब्ध झालेली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता. राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन आज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर दिलेली आहे.

शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहितीसाठी विविध उपक्रम

शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान संदर्भात माहिती व्हावी यासाठी शासन अनेक कृषी प्रदर्शने आयोजित करत असून या मधून शेतकरी बांधवाना मोठ्या प्रमाणत नवीन तंत्रज्ञान संदर्भात माहिती मिळण्यास मदत होत आहे.

विविध शेतकरी मिळावे, कृषी प्रदर्शन, शिवार फेरी या माध्यमांतून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणत जागृती होत असून याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पनात आता वाढ होत आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मिळेल 50 हजार प्रती एकर भाडे

शेतीला पूरक व्यवसायाची जोड

शेतीला पूरक व्यवसाय म्हून दुग्ध व्यवसाय केल्यास स्वतः बरोबरीने इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून देता येतो. दुग्धव्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला आता शासनाकडून अनुदान देखील मिळते. जेणे करून आपण शेतीकारून आपला व्यवसाय सुरु करू शकतो.

तुमच्या शेतीला कितीही पाणी असेल आणि ते उपसा करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्याकडे वीज उपलब्ध नसेल तर यासाठी सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी अनुदान दिले जाते.

यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लगतो. या संदर्भात देखील आपण आपल्या युट्युब चानालवर व्हिडीओज बनविलेले आहेत हे व्हिडीओ बघून देखील तुम्ही त्याप्रमाणे अर्ज करून शासकीय योजनांचा लाभ घेवू शकता.

केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असून या संदर्भात अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते.

तुम्ही देखील राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा नक्की लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *