अंगणवाडी सेविका होमगार्ड कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधनात वाढ

अंगणवाडी सेविका होमगार्ड कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधनात वाढ

राज्य शासनाने अंगणवाडी सेविका होमगार्ड कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधनात दुपटीने वाढ केलेली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

ग्रामीण पातळीवर अंगणवाडी सेविका होमगार्ड, कोतवाल तसेच ग्रामरोजगार सेवक खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात. अनेक दिवसांपासून यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

आपण एकएक करत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हि महती संपूर्ण पहा जेणे करून तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती कळू शकेल.

खालील योजना पण पहा

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा

अंगणवाडी सेविका मानधनात वाढ

ग्रामीण भागामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असतांना शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अंगणवाडी सेविका खूप महत्वाची भूमिका पार पडत असते. यामुळे या बाबीचा विचार करून राज्य शासनाने अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ केलेली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत दिनांक १ अक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधानामध्ये वाढ करण्यात आली आहे. या शिवाय त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील लागू करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ तसेच प्रोत्साहन भत्ता वाढ संदर्भातील शासन निर्णय अर्थात जी आर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अंगणवाडी सेविका मानधन वाढ संदर्भातील शासनाचा जी आर पहा

खालील योजनेचा देखील लाभ घ्या

कांदाचाळ अनुदान वाढले रोजगार हमी मंत्र्यांनी दिली माहिती पहा किती मिळणार नवीन अनुदान

होमगार्ड यांच्या मानधनात वाढ

महाराष्ट्र शासनाने होमगार्ड यांच्या विविध भात्यामध्ये वाढ केलेली आहे. हे भत्ते खालीलप्रमाणे आहे.

कर्तव्य भत्ता.

उपहार भत्ता.

कवायत भत्ता.

खिसा भत्ता.

भोजन भत्ता.

होमगार्ड यांच्या वरील प्रकरच्या भात्यामध्ये वाढ करण्यात आली असून यामुळे राज्यातील होमगार्ड यांना दिलासा मिळालेला आहे.

कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अप्पातीमध्ये पोलिसांना सहकार्य करणे, विविध संप काळात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास सहकार्य करणे हि होमगार्ड स्वयंसेवकाची प्रमुख कार्य आहेत.

होमगार्ड यांच्या मानधनवाढ संदर्भातील शासननिर्णय पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

होमगार्ड मानधन वाढ जी आर पहा

खालील योजना पण महत्वाची आहे

ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरु 5 लाख मिळेल लाभ tractor anudan yojana 2024

कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ

ग्रामीण भागामध्ये महसूल विभागाचा कणा म्हणून समजला जाणार कोतवाल हा सर्वांच्या परिचयाचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या १२ हजार ७२३ एवढे कोतवाल कार्यरत आहेत. कोतवाल यांना चतुर्थ वर्ग श्रेणीची पगार द्यावी या संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच कोतवाल संघटनानी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.

याच बाबीचे महत्व लक्षात घेवून शासनाने कोतवाल यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याच्या निर्णय घेतलेला आहे.

या संदर्भातील शासननिर्णय देखील तुम्ही बघू शकता.

कोतवाल मानधन वाढ शासन निर्णय पहा.

मंत्रिमंडळ निर्णय पहा

ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधनात वाढ

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत विविध कामे करतांना ग्राम रोजगार सेवक खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात.

कामाच्या तुलनेत मात्र ग्रामरोजगार सेवक यांना अत्यंत कमी मानधन मिळते. याच बाबीचे महत्व लक्षात घेवून राज्य शासनाने ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भाती जी आर देखील निर्गमित केलेला आहे.

ग्राम रोजगार सेवक यांना दरमहा ८ हजार रुपये मानधन मिळणार आहे. या शिवाय २ टक्के प्रोत्साहन अनुदान, प्रवास भत्ता, मोबाईल डेटा पॅक इत्यादी योजनांचा लाभ मिळणार आहे.

2000 दिवस काम केलेल्या ग्राम रोजगार सेवक यांना प्रती महिना १ हजार रूपये व २००१ दिवसांपेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा २ हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येणार आहे.

ग्रामरोजगार सेवक मानधनवाढ संदर्भातील शासन निर्णय पहा

मंत्री मंडळ निर्णय पहा

खालील व्हिडीओ पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *