बियाणे टोकन यंत्र अर्ज सुरु ५० टक्के मिळेल शासनाकडून सबसिडी

बियाणे टोकन यंत्र अर्ज सुरु ५० टक्के मिळेल शासनाकडून सबसिडी

जाणून घेवूयात बियाणे टोकन यंत्र biyane tokan yantra online application process अर्ज संदर्भात सविस्तर माहिती.

महाडीबीटी वेबसाईटवर बियाणे टोकन यंत्रासाठी ५० टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. ज्या शेतकरी बांधवाना हे अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी त्यांचे अर्ज शेवटच्या तारखेच्या आत सादर करून द्यावेत.

तुम्हाला जर बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे माहित नसेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे लागतात pdf मध्ये डाउनलोड करून घ्या

जाणून घ्या बियाणे टोकन यंत्र अर्ज संदर्भात सविस्तर माहिती

खरीप असो कि रब्बी पेरणी करतांना मजूर जमा करताना शेतकरी बंधवाची दमछाक होते. अशावेळी तुमच्याकडे जर बियाणे टोकन यंत्र असेल तर अगदी सहजतेने आणि कमी वेळात जास्त काम केले जाते.

हे बियाणे टोकन यंत्र बाजारातून खरेदी करायचे असेल तर त्यासाठी खर्च येते पण आता शासन यासाठी ५० टक्के अनुदान देत असून यासाठी शेतकऱ्याला महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो.

पेरणीसाठी टोकन यंत्र वापरणे म्हणजे मजुरांच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते.

त्यामुळे अनेक शेतकरी अशा महत्वाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात.

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा

कोठे आणि कसा करावा बियाणे टोकन यंत्र अर्ज

बियाणे टोकन यंत्र अर्ज biyane token yantra arj करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लायसेन्स किंवा आयडीची आवश्यकता नाही. तुम्ही जर शेतकरी असाल तर स्वतः या योजनेसाठी अर्ज करू शकता. अट मात्र एकच आहे कि तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर जोडलेला असणे गरजेचे आहे.

महाडीबीटी या वेबसाईटवर जावून तुम्ही स्वतः या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

आधार ओटीपीच्या सहाय्याने लॉगीन करून तुम्ही अर्ज सादर करू शकता. एकदा का लॉगीन झाले कि मग टोकन यंत्रासह इतर विविध योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

तुम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर २३.६० एवढे शुल्क शासनाला भरावे लागते. त्यानंतर तुम्हाला पवती येते हि पावती पुढील संदर्भासाठी जवळ असू द्यावी.

प्रत्यक्ष व्हिडीओ पहा

बऱ्याच वेळेस लिहिलेली माहिती समजण्यास अडचण येते अशावेळी प्रत्यक्ष व्हिडीओ असेल तर तो अधिक फायदेशीर आणि महत्वाचा ठरू शकतो.

याच बाबीचा विचार करून आम्ही आमच्या वाचकांसाठी बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज कसा करावा याचा लाइव डेमो घेवून आलेलो आहोत.

खालील व्हिडीओ काळजीपूर्वक पहा जेणे करून तुम्हाला biyane tokan machine संदर्भात सविस्तर माहिती कळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *