बोअरवेलला कमी पाणी असेल तर ते आधुनिक तंत्रज्ञान वापरून कसे वाढवावे जाणून घेवूयात या विषयी माहिती.
शेतीसाठी असेल किंवा घरघुती वापरासाठी असेल अनेक शेतकरी बांधव किंवा सर्वसामान्य नागरिक बोअरवेल घेत असतात. परंतु कधी कधी अशा बोअरवेलला कमी पाणी लागते परिणामी शेतकरी बांधवांचा किंवा सर्वसामान्य नागरिकांचा खर्च वाया जावू शकतो.
तुमच्या बोअरला जर कमी पाणी असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाने बोरचे पाणी वाढविणे आता शक्य झाले आहे.जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहीती.
बोअरवेलला कमी पाणी असेल डिजिटल कॅमेऱ्याने तपासणी करून वाढविता येते पाणी
आता बोआरला कमी पाणी असेल तर काळजी करण्याचे कारण नाही कारण आधुनिक तंत्रज्ञानाने बोअरमध्ये डिजिटल कॅमेरा सोडून पाण्याची काही शक्यता आहे का ती तपासली जाते.
काही ठिकाणहून पाणी जास्त टपकत असेल तर अशा ठिकाणी चर किंवा ब्लास्टिंग घेवून पाण्याचा प्रवाह मोकळा होतो. काही विविध केमिकल वापरून सुद्धा बोरला पाणी वाढविले जाते. आशा पद्धतीने कमी पाणी असलेल्या बोअरवेलला अधिक पाणी लागू शकते.
बऱ्याच वेळेस बोअरवेलमध्ये विद्युत मोटर अडकते हि मोटार कशाने अडकली याचा नेमका अंदाज बांधता येत नाही अशावेळी देखील हा डिजिटल कॅमेरा बोअरवेलमध्ये सोडून शहानिशा केली जाते.
विहीर आडवे बोअर घेण्यासाठी मशीनने पाणी तपासणी करूनच करा खोदकाम
तुमच्या बोअरला कमी पाणी असेल तर पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो याशिवाय आधुनिक मशीनद्वारे नवीन बोअर विहीर खोदकाम करण्यासाठी तसेच आडवे बोअर घेण्यासाठी पॉइंट उपलब्ध करून देण्यात येतात.
मशीनद्वारे पाणी तपासले म्हजेच १०० टक्के पाणी लागेलच असे नाही मात्र या मशीनने पाणी तपासले तर अधिक अचूकता येते आणि होणारा खर्च वाचू शकतो हि बाब पाणी तपासतांना लक्षात घ्यावी.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
पाणी तपासण्यासाठी संपर्क करा
कमी असलेल्या बोअरचे पाणी वाढविणे, नवीन बोअर पॉइंट, विहीर पॉइंट बघण्यासाठी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे डॉक्टर ईश्वर वाघ यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. या यंत्राच्या सहाय्याने तुम्हाला पाणी तपासायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा.
9527008193 किंवा 8888708809
तर अशा पद्दतीने तुम्ही तुमच्या बोअरचे पाणी डिजिटल कॅमेऱ्याच्या सहाय्याने चेक करून वाढवू शकता. शेतीसाठी पाणी असेल तर अगदी खडकाळ जमींवर देखील चांगल्या पद्धतीने पिक घेता येते. त्यामुळे शेतीसाठी पाणी खूपच आवश्यक असल्याने शेतकरी बांधवाना हे नवीन तंत्रज्ञान माहिती व्हावे या उद्देशाने हि माहिती देण्यात आली आहे.
अर्थात कोणतेही मशीन अगदी तंतोतंत माहिती सांगू शकत नाही त्यामुळे बोअर किंवा विहिरीसाठी पाणी तपासणी करून घेतांना जो व्यक्ती पाणी तपसणी करेल त्यांच्याकडून खात्री करून घ्यावी जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही.