वादळी पाऊस पडण्याची शक्यता या दिवसापर्यंत राहणार पाऊस पिके सुरक्षित ठेवा

वादळी पाऊस पडण्याची शक्यता या दिवसापर्यंत राहणार पाऊस पिके सुरक्षित ठेवा

वादळी पाऊस पडण्याची शक्यता.

महाराष्ट्रामध्ये रविवार म्हणेच दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वादळी पाऊस पडणार असल्याचा ईशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

अनेक शेतकरी सध्या त्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन किंवा इतर पिके गोळा करण्यात व्यस्त आहेत अशावेळी हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

सध्या अनेक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कापूस वेचणी सुरु आहे. काही शेतकरी बांधवांच्या शेतात सोयाबीनची मळणी सुरु आहे.

सोयाबीनला आधीच बाजारात भाव नसल्याने शेतकरी नाराज आहेत त्यातच जर पावसाने सोयाबीन भिजली तर अजून कमी भाव मिळण्याची शक्यता असते त्यामुळे शेतातील सोयाबीन झाकून ठेवावी जेणे करून त्यामध्ये पाणी जावून पिकाचे नुकसान होणार नाही.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे लागतात pdf मध्ये डाउनलोड करून घ्या

कधी पडणार पाऊस

महाराष्ट्र राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण पूर्व बंगालचा उपसागरापासून ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी पर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिमाण असा होत आहे कि या भागाकडून बाष्पयुक्त वारे वाहत आहे.

याचा परिणाम असा होत आहे कि कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात वादळी वारे मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह पाउस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

१ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान हा वादळी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वादळी पाऊस पडण्याची शक्यता पिके सुरक्षित ठेवावीत

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने आधीच शेतकरी वर्गामध्ये या संदर्भात नारजी व्यक्त होत असताना अशामध्ये जर पावसामुळे सोयाबीन ओली झाली तर अजूनच भाव कमी होऊ शकतो त्यामुळे सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल किंवा कोणतेही पिक असेल हे पिक शेतकरी बांधवानी संरक्षित करून ठेवावे.

या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे देखील नुकसान होऊ शकते. कापूस मोठ्या प्रमाणात वेचणीस आला असून अशावेळी जर पावसात हा कापूस भिजला तर काळा काळा देखील पडण्याची शक्यता असते.

त्यामुळे कापूस असेल तर वेचणी करून घ्या. सोयाबीन जमा केली असेल तर व्यवस्थित झाकून ठेवा जेणे करून तुमच्या शेतातील पिकांचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान होणार नाही.

हवामान अंदांज संदर्भातील बातमी पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *