Ration card ekyc करण्यास मुदतवाढ पहा सविस्तर माहिती.
तुमच्या राशन कार्डला आधार लिंक जर नसेल तर ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली होती.
३१ तारखेपूर्वी जर तुम्ही तुमच्या राशनकार्डला आधार लिंक केले नसेल तर तुमचे राशन बंद होणार अशा आशयाच्या बातम्या वाचण्यास मिळत होत्या.
त्यामुळे ज्यांनी राशनकार्डला आधार नंबर लिंक केले नाही त्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु आता अशा नारीकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता राशनकार्डला आधार लिंक करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
३१ डिसेंबर २०२४ हि राशनकार्डला आधार लिंक करण्याची नवीन तारीख देण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल दोन महिने हि मुदतवाढ देण्यात आली आहे.
राशनला आधार लिंक केल्यास बोगस राशन कार्ड होणार बाद
सार्वजनिक वितरण प्रणालीमधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी अन्न व नागरी विभागाकडून आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी बोगस राशन कार्ड समोर आल्याचे निदर्शनास आले असल्याने अनेकांना आता राशनकार्डला आधार नंबर लिंक करण्याची सूचना शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
ज्यांचे राशनकार्डची इकेवायसी बाकी असेल त्यांनी दिलेल्या तारखेच्या आत ekyc करून घ्यावी.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा