शिलाई मशीन प्रशिक्षण देवून कशा प्रकारे अनेक महिलांनी त्यांचा व्यवसाय सुरु केला आहे जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती.
या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ दिलेला आहे तो नक्की पहा
विविध शासकीय योजनांची माहिती देत असतांनाच बेरोजगार तरुणांचा विचार करून आपण आपल्या वेबसाईटवर विविध व्यावसायिक यशस्वी गाथा अर्थात success story संदर्भात आपण माहिती देत आलेलो आहोत.
आजची व्यावसायिक भरारी बघून देखील तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल.
बेरोजगारी वाढल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. तुम्ही देखील बेरोजगार तरुण किंवा तरुणी असाल तसेच तुमच्या बरोबरीने इतरही व्यक्ती बेरोजगार असतील तर अशावेळी तुम्ही तुमच्या गावात किंवा गाव परिसरामध्ये टेलरिंगचा व्यवसाय सुरु करू शकता.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे लागतात pdf मध्ये डाउनलोड करून घ्या
रेवती इंडस्ट्रीज भोकरदन येथे महिलांना दिले जाते शिलाई मशीन प्रशिक्षण
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रेवती इंडस्ट्रीज येथे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात टेलरिंग व्यवसाय प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याने आज अनेक महिला भगिनी रेवती इंडस्ट्रीजचे ऋण व्यक्त करत आहेत.
येथे कशा प्रकारे महिलांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो आणि हे टेलरिंग काम चालते कसे शिवाय इथल्या महिलांचा काय अनुभव आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जेणे करून तुम्हाला देखील या पासून प्रेरणा मिळू शकेल.
खालील योजना पण कामाची आहे.
पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड करा ऑनलाईन pm vishwakarma identity card download
शिलाई मशीन प्रशिक्षण घेवून सुरु करा स्वतःचा व्यवसाय
टेलरिंग अर्थात शिवणकाम करून तुम्ही बेरोजगारीवर मात करू शकता. महिला किंवा पुरुष कोणीही असेल आणि त्यांना व्यवसाय करायचा असेल तर टेलरिंग अर्थात शिवाणकाम हा व्यवसाय तुम्हाला तुमच्या गावातच रोजगार निर्मिती करून देवू शकतो.
कोणताही व्यवसाय करायचा म्हटल्यावर तो कितपत यशस्वी झाला आहे हे प्रत्यक्ष पहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
अनेक महिलांनी सुरु केला व्यवसाय
त्यामुळे आज आपण आपल्या परिसरातील बेरोजगार बांधवांसाठी प्रत्यक्ष अशा व्यवसायाला भेट दिली आहे ज्या ठिकाणी ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना टेलरकाम शिकवणी देवून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
खाली दिलेला व्हिडीओ बघून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि तुमच्यात देखील उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण होईल.
खालील व्हिडीओ पहा.
वरील व्हिडीओ बघितल्यावर तुमच्या लक्षात आले असेल कि कशा पद्धतीने ग्रामीण भागातील महिलांनी रेवती इंडस्ट्रीज येथे प्रशिक्षण घेवून टेलरिंग व्यवसाय करून आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत.
तुम्ही देखील बेरोजगार महिला किंवा युवक असाल तर निराश होण्याचे काहीही कारण नाही कारण टेलरिंग असेल किंवा इतर कोणताही छोटा मोठा व्यवसाय करून तुम्ही तुमच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवू शकता.
शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी मिळते शासकीय अनुदान
मशीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान देखील मिळते. शासकीय अनुदानावर शिलाईमशीन घेतल्यास तुम्हाला आर्थिक सहाय्य देखील मिळते.
शिलाई मशीन शासकीय अनुदान मिळविण्यासाठी कोणती योजना असते या संदर्भाती सविस्तर माहितीसाठी खालील लिंकर क्लिक करा.
तर अशा पद्धतीने आमच्या डिजिटल डीजी टीमने सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण व्यवसायातील कशा संधी आहेत या संदर्भात माहिती घेतली आहे. या यशस्वी व्यवसाय गाथेचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल यात शंका नाही.
अशाच प्परकारची माहिती जाणून घेण्णयासाठी आमच्या फेसबुकपेज ला भेट द्या.