रब्बी पिक विमा 2024 अर्ज सुरु झालेलेल असून निवडणुकीच्या घाईमध्ये आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढायला विसरू नका.
तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये गहू, हरभरा किंवा ज्वारी हे पिक लावलेले असेल तर या पिकांचा रब्बी पिक विमा लवकरात लवकर काढून घ्या.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकरी स्वतः देखील त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढू शकतात. स्वतः रब्बी पिक विमा अर्ज कसा सादर केला जातो या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आला आहे. तो व्हिडीओ पाहून त्या प्रमाणे तुम्ही अर्ज सादर करू शकता.
कोणती आहे रब्बी पिक विमा अर्ज करण्याची शेवटची तारीख
रब्बी पिक विमा अर्ज सुरु झाले असून गहू आणि हरभरा या पिकांसाठी पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२४ हि आहे.
१५ डिसेंबर २०२४ च्या आत तुम्ही तुमचा अर्ज करू शकता त्यामुळे लवकरात लवकर तुमचा करून द्या. तुमच्या शेतातील गहू किंवा हरभरा असेल आणि नैसर्गिक संकटामुळे त्या पिकांचे नुकसान झाले असेल तर अशावेळी पिक विमा कंपनीकडे नुकसानभरपाई मिळविण्यासाठी तुम्हाला पिक विमा आवश्यक असतो.
रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज नेमका करावा तरी कसा लागतो या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
कोणती कागदपत्रे लागतात रब्बी पिक विमा अर्ज सादर करण्यासाठी
रब्बी पिक विमा 2024 चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे लागतात.
- बँक पासबुक.
- जमिनीचा डिजिटल सातबारा आणि 8 अ.
- पिक पेरा.
- जमीन जर भाडे तत्त्वावर करत असाल तर त्या संदर्भातील करारनामा.
यामध्ये डिजिटल सातबारा कोणतीही व्यक्ती डाउनलोड करू शकतो यासाठी विशेष असे लासेंस लागत नाही. डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पिक पेरा हे कागदपत्र देखील रब्बी पीकविमा २०२४ साठी अत्यंत महत्वाचे आहे. ऑनलाईन अर्ज करतांना पिक पेरा अपलोड करावा लागतो.
आम्ही खास तुमच्यासाठी रब्बी पिक पेरा २०२४ डाउनलोड करण्याची व्यवस्था केली आहे. खालील लिंकवर क्लिक करून हा पिक पेरा डाउनलोड करून घ्या त्यावर व्यवस्थित माहिती भरून अर्ज सादर करून द्या.
कसा मिळेल पिक विमा
ज्यावेळी तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान होईल त्यावेळी तुम्हाला crop insurance application app च्या सहाय्याने पिक विमा कंपनीस शेतात झालेल्या गहू किंवा हरभरा पिकांच्या नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस कळवावी लागेल.
यासाठी तुम्हाला पिक विमा भरलेल्या पावतीवर जो पिक विमा क्रमांक असतो तो टाकावा लागतो.
पिक विमा कंपनीस नुकसानीची सूचना देण्याच्या अनेक पद्धती आहेत crop insurance application च्या सहाय्याने जर तुम्ही सूचना दिली तर ती लवकर पिक विमा कंपनीस मिळते आणि तुम्हाला लगेच docket ID मिळतो.
या docket ID च्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यास मदत होते.
अशा पद्धतीने तुम्ही रब्बी पिक विमा 2024 साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.