महाराष्ट्र राज्याच्या २१ व्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असल्याने लाडकी बहिण योजनेचा २१०० रुपयांचा हफ्ता आता सर्व महिलांना मिळेल अशी अशा तमाम भगिनींना लागलेली आहे.
परंतु प्रत्यक्ष स्थिती मात्र वेगळीच असणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या घवघवीत यशामुळे महायुती सरकारला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहिण योजनेचे मानधन आता २१०० रुपये करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
आता सरकार महायुतीचे आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार या संदर्भात महिलांना उत्सुकता लागलेली आहे.
खालील माहिती पण वाचा
लाडकी बहिण योजना 2100 रुपये मिळणार पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल
लाडकी बहिण योजनेला नियम व अटी लागल्याने कमी होणार लाभार्थी संख्या
पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली होती. अर्थात निवडणुकीच्या तोंडावर हि घोषणा करण्यात आल्याने अनेक महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता.
यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना २१०० प्रती महिना लाभ मिळणार असल्याने याचा आर्थिक बोजा सरकारवर येणार आहे.
आता मात्र या योजनेसाठी निकष ठरविण्यात येणार आहेत. जे महिला लाभार्थी निकषाबाहेर आहेत अशा महिलांना यापुढे लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.
कधी केली जाणार मानधनात वाढ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा निधी १५०० रुयांवरून २१०० रुपये जरी करण्यात आला असला तरी हा निधी लगेच मिळणार नाही.
यासाठी पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरुतूद केली जाणार असून यासाठी एप्रिल महिना उजाडावा लागणार आहे.
त्यामुळे ज्या महिलांना सरसकट लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावे लागणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकरी सन्मान निधी योजनेतील लाभार्थाना देखील मिळेल ब्रेक
केवळ लाडकी बहिण योजनाच नव्हे तर राज्य शासनच्या वतीने शेतकरी सन्मान निधी या योजनेतून देखील पीएम किसान निधी प्रमाणे शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो.
या योजनेसाठी देखील आर्थिक निकष ठरविले जाण्याची शक्यता आहे. एकूणच काय तर आता महाराष्ट्रामध्ये ज्या योजना सुरु आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावून जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांना वगळले शक्यता निर्माण झाली आहे. लाडकी बहिण योजनेला लागणार चाळणी.