लाडकी बहिण योजना 2100 हफ्ता तारीख फिक्स या तारखेला मिळणार

लाडकी बहिण योजना 2100 हफ्ता तारीख फिक्स या तारखेला मिळणार

लाडकी बहिण योजना 2100 पुढील कधी मिळणार मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती वाचा सविस्तर.

महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी महिलांना दर महिन्याला २१०० रुपये हफ्ता देणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे हा २१०० रुपयांचा हफ्ता कधी मिळेल याकडे तमाम महिलांचे लक्ष लागलेले आहे.

या योजना अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये प्रती महिना दिला जात होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान १५०० एवजी २१०० रुपये प्रती महिना महिलांना देवू अशी घोषणा केल्यामुळे आता सार्वजन हे २१०० बँकेत कधी जमा होतात याकडे लक्ष ठेवून आहेत.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनामध्ये महिलांना २१०० रुपये कधी मिळणार या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

खालील महत्वाची माहिती पण वाचा

लाडकी बहिण योजना कागदपत्रे अंधुक असतील तर होईल अर्ज रद्द पहा कसे करावे लागते योग्य पद्धतीने कागदपत्रे अपलोड

लाडकी बहिण योजना या दिवशी मिळणार २१०० रुपयांचा हफ्ता

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पुढील हफ्ता जमा केला जाणार आहे.

नागपूर येथे दिनांक १६ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरु झालेले असून ते २१ डिसेंबर २०२४ रोजी समाप्त होत आहे.

म्हणजेच २२ डिसेंबर २०२४ नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थींना २१०० रुपयांचा हफ्ता मिळू शकणार आहे.

तुम्ही जर पात्र महिला असाल तर तुम्हाला आता लवकरच हा लाडकी बहिण योजनेचा हफ्ता  मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *