अरुण जेटली कोण होते 28 December Arun Jaitley birth anniversary

अरुण जेटली कोण होते 28 December Arun Jaitley birth anniversary

आज जाणून घेवूयात अरुण जेटली Arun Jaitley संदर्भातील सविस्तर माहिती. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते त्यावेळी म्हणजेच १९९९ मध्ये त्या सरकारमध्ये ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते.

अरुण जेटली यांची खरी कारकीर्द सुरु झाली ती १९७४ पासून. १९७४ मध्ये अरुण जेटली यांची दिल्ली विद्यापीठामध्ये छात्रसंघपदी निवड करण्यात आली होती. याच वेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांची त्यांना कदाचित चाहूल लागल्याने त्यांनी पुढे म्हणजेच १९७७ साली जनता पार्टीच्या प्रचारास सुरुवात केली.

अवघ्या तीन वर्षानंतर म्हणजेच १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची अधिकृत स्थापना झाल्यानंतर अरुण जेटली यांची पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.

इमेलने अपडेट मिळवा.

Newsletter

अरुण जेटली यांना मिळाली विविध पदे

त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीने त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनविले.

त्यांनी आपल्या कामाचा प्रभाव दाखविल्याने त्यांना सरकारमध्ये मोठी पदे देखील मिळाली. १९९९ मध्ये वाजपेयी सरकारमध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्री हे पद देण्यात आले होते.

त्यानंतर त्यांना केंद्रीय कायदा मंत्री हे पद देखील देण्यात आले. अरुण जेटली Arun Jaitley हे वयाच्या ४७ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले. एवढेच नव्हे तर केंद्रामध्ये संरक्षण आणि अर्थ खाते देखील त्यांना देण्यात आले होते.

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडण्यास मदत

२०१० या वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून देखील सन्मानित करण्यात आले होते. २००० ते २०१२ या काळात त्यांना तीनदा गुजरातमधून राज्यसभेत पाठविण्यात आले होते. २०१८ मध्ये त्यांना चौथ्या वेळी उत्तर प्रदेश येथून राज्य सभेत पाठविण्यात आले.

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यात अरुण जेटली Arun Jaitley यांची देखील महत्वाची भूमिका होती. जेंव्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणू घोषित करण्याची वेळ आली होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तयार नव्हते.

कारण पंतप्रधानाच्या उमेदवारीसाठी ते स्वतः इच्छुक होते. त्यावेळी त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांची मनधरणी केली ज्यामुळे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला.

अमृतसरमधून ते पराभूत झाले तरीदेखील नरेंद्र मोदींनी त्यांना केंद्रामध्ये संरक्षण आणि अर्थ खात्याची जबाबदारी दिली होती.

Our Facebook page

राजकारणा पलीकडचे जेटली

हे झाले राजकीय अरुण जेटली. राजकारणाव्यतिरिक्त देखील त्यांना विविध क्षेत्रामध्ये रस होता. त्यांना क्रिकेट हा खेळ देखील खूप आवडायचा.

या क्रिकेटप्रेमापायी ते दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी देखील विराजमान झाले होते. पुढील काळात म्हणजेच २००९ मध्ये त्यांना बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदाची देखील संधी मिळाली.

अशा या अष्टपैलू व्यक्तीचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी दिल्ली येथे झाला. कायद्याचे शिक्षण देखील त्यांनी दिल्ली विद्यापिठातूनच पूर्ण केले. २४ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वकिली शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरु केली लवकरच त्यांचे नाव सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ तसंच नामवंत वकिलांच्या यादीत आले.

अरुण जेटली Arun Jaitley हे केवळ राजकारणीच नव्हे तर एक चांगले विचारवंत देखील होते. नवतरुणांना नेहमीच त्यांचे विचार मार्गदर्शन करत राहील. अशा अष्टपैलू नेतृत्वास जन्म २८ डिसेंबर जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *