पीएम किसान सन्मान निधीचे पैसे या दिवशी होणार जमा शासनाकडून तारीख जाहीर

पीएम किसान सन्मान निधीचे पैसे या दिवशी होणार जमा शासनाकडून तारीख जाहीर

पीएम किसान सन्मान निधीचा १९ वा हफ्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी म्हणजेच पुढील सोमवारी मिळणार असल्याची अधिकृत माहिती आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना वर्षाला ६ हजार रुपये अनुदान देण्यात येते. हे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज मंजूर झाला कि मग पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात.

या संदर्भातील अधिकृत माहिती शासनाच्या https://pmevents.mygov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे वितरण दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दुपारी २ वाजता केले जाणार आहे.

त्यामुळे जे शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आता २००० हजार रुपयांचा हफ्ता लवकरच जमा होणार आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही योजनेचा लाभ

अनेक शेतकरी बांधवाना या पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी असतात. पीएम किसान सन्मान निधीचे सुरुवातीला जर पैसे मिळालेले असेल आणि आता बंद झाले असेल तर अशावेळी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता कि तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत.

खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे पैसे का मिळत नाहीत.

pm kisan nidhi payment proceed असे चेक करा पैसे आले कि नाही

पीएम किसान सन्मान निधीचे पैसे बँकेत जमा न होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बँक खाते माहिती चुकीचे असणे होय. बँक खात्याचा एखादा अंक चुकून कमी किंवा जास्त झाला तरी तुमच्या तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे ekyc असेल किंवा बँक अपडेट असतील तर हि माहिती अचूक असल्याची खात्री करावी.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत देखील मिळते अनुदान

Namo shetkari maha sanman nidhi yojana अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. ज्या पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात अगदी त्याच धर्तीवर नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये अनुदान दिले जाते.

म्हणजेच दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये अनुदान दिले जाते.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळते त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना Namo shetkari mahasanman nidhi yojana अंतर्गत देखील अनुदान मिळते.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना PM kisan sanman nidhi yojana अंतर्गत अनुदान मिळते त्या शेतकऱ्यांचा डाटा नमो शेतकरी योजनेमध्ये फेच केला जातो.

त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा २ हजार रुपयांचा ६ वा हफ्ता देखील लवकरच मिळणार आहे.

असे तपासा नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स

पीएम सन्मान निधीचे पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे देखील पैसे मिळतात. लाभार्थीला नमो शेतकरी महा सन्मान निधीचे किती हफ्ते मिळालेले आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धत वापरा.

नमो शेतकरी महा सन्मान निधी वेबसाईटला भेट द्या.

वेबसाईट ओपन झाल्यावर beneficiary status असा पर्याय शोध त्यावर क्लिक करताच आणखी एक विंडो ओपन होईल.

यामध्ये लाभार्थीला आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. कॅपचा कोड टाकून get Adhar otp या बटनावर क्लिक करा.

 दिलेल्या चौकटीत otp टाकल्यानंतर तुम्हाला किती हफ्ते मिळाले आहेत आणि कधी मिळाले आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती दिसेल.

हि माहिती तुम्ही pdf मध्ये देखील सेव्ह करू शकता किंवा प्रिंट काढू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *