घरबसल्या करा रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी मोबाईलद्वारे

घरबसल्या करा रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी मोबाईलद्वारे

जाणून घेवूयात रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी संदर्भात सविस्तर माहिती.

रेशन कार्ड बहुदा सगळ्यांकडे असतेच परंतु घरातील एखादा लहान मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि आता ते मोठे झाले असतील तर त्यांचे नाव राशन कार्ड यादीमध्ये नोंदणी करणे गरजेचे असते.

घरातील सदस्याची रेशन कार्ड मध्ये नोंदणी बाकी असेल तर तुम्ही Mera ration app 2.0 या app द्वारे नवीन नोंदणी करू शकता.

रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे आता खूपच सोपे झाले आहे. पूर्वी रेशन कार्ड यादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करायचे असल्यास तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात जावे लागत असते.

आता मात्र शासनाने नागरिकांची कुचंबना होऊ नये यासाठी रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी करण्याची सुविधा अगदी मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून दिली आहे.

घरबसल्या राशनकार्ड यादीमध्ये नवीन नाव कसे समाविष्ट केले जाते जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

राशन कार्ड रद्द होणार पहा सविस्तर माहिती

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी करणे का आवश्यक

प्रत्येक गावातील नागरिकांसाठी स्वस्त धान्य दुकानामध्ये शासनाकडून नगरीकांना मोफत धान्य तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे गरजेचे असते. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर लगेच त्यासाठी लगेच अर्ज सादर करून द्या.

मोफत गहू, तांदूळ, तेल एवढेच नव्हे तर पिवळे राशनकार्ड धारकांना शासनाकडून मोफत साडी देखील मिळत आहे.

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचे नाव रेशन कार्ड यादीमध्ये असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे राशनकार्ड असेल आणि त्यामध्ये तुमचे किंवा तुमच्या घरातील एखाद्या सदस्याचे नाव राशनकार्ड यादीमध्ये नसेल तर ते कसे समाविष्ट केले जाते या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहितीचा व्हिडीओ उपलब्ध करून दिला आहे.

नवीन नाव समाविष्ट करण्याची ऑनलाईन पद्धत

रेशनकार्ड यादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला गुगलप्ले स्टोअर मधून mera ration 2.0 हे मोबाईल app इंस्टाल करून घ्या.

यासाठी लाभार्थीच्या आधार कार्ड क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. आधार लिंक मोबाईलवर एक otp पाठविला जातो हा otp टाकून लॉगीन करायचे आहे.

अर्थात हि सर्व प्रोसेस कशी आहे या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा.

वरील व्हिडीओ पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांचे किंवा कोणाचेही नाव रेशनकार्ड यादीमध्ये समाविष्ट करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *