बेरोजगारांना मिळणार ५ हजार रुपये प्रती महिना ऑनलाईन अर्ज करा

बेरोजगारांना मिळणार ५ हजार रुपये प्रती महिना ऑनलाईन अर्ज करा

बेरोजगारांना मिळणार ५ हजार रुपये.

बेरोजगारांना प्रती महिना ५ हजार रुपये मिळणार आहेत पण कसे आणि कोणत्या योजनेतून जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

सध्या महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक तरुणांच्या हाताला सध्या काम नाही अशामध्ये आता अशी बातमी वाचली तर आनंद होणार नाही तर नवलच.

Pm internship scheme या योजनेतून बेरोजगार तरुणांना १२ महिन्यासाठी प्रती महिना ५ हजार रुपये दिले जाणार आहे.

एवढेच नव्हे तर Pm internship scheme योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस जोडले तर त्यासाठी देखील ५ हजार रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आले आहे.

खालील योजना पण पहा.

Ration card ekyc 2025 करा मोबाईलवरून नाहीतर कमी होईन राशन कार्ड यादीतून नाव

बेरोजगारांना मिळणार ५ हजार रुपये पण कसे

बेरोजगार तरुणांना कंपनी आस्थापनेमध्ये कामाच्या अनुभवाची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु केली आहे.

हि योजना महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांसाठी लागू आहे. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असाल तर ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करण्याची तारीख आहे. या तारखेच्या आत इच्छुक तरुणांनी त्यांचे अर्ज सादर करून द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या तरुणांनी या योजना अंतर्गत अर्ज केले आहेत त्यांना इंटर्नशिपचा लाभ घेता येईल. या इंटर्नशिपच्या दरम्यान सदरील युवकांना प्रती माह ५ हजार रुपये मिळणार आहेत.

यातील ४५०० केंद्र सरकारकडून मिळेल तर उर्वरित ५०० रुपये हे इंडस्ट्रीजद्वारे मिळतील. याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर ६ हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे.

घरबसल्या करा रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी मोबाईलद्वारे

योजनेसाठी पात्रता

इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर आणि ITI शैक्षणिक पात्रताधारक युवक Pm internship scheme योजनेचा लाभ घेवू शकतात.

अर्ज करताना वय २१ ते २४ वर्षे यादरम्यान असावे.

घरातील कोणत्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे.

अर्जदाराच्या घरातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीला नसावी.

वरील प्रकारची पात्रता धारक व्यक्ती प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी पात्र असणार आहेत.

ऑनलाईन अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. सगळ्यात आधी लक्षात घ्या कि ज्या युवकांचे वय २१ ते २४ दरम्यान आहे त्यांनीच या योजनेसाठी अर्ज करावा.

यापेक्षा वय कमी असेल किंवा जास्त असेल तर ऑनलाईन अर्ज करता येणार नाही व वेळ देखील वाया जाईल त्यामुळे वयाची ऑनलाईन अर्ज करण्याआधीच खात्री करून घ्यावी.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना Pm internship scheme ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाल संपूर्ण माहिती मिळू शकेल.

वरील व्हिडीओ बघितल्यानंतर Pm internship scheme योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात तुम्हाला कल्पना येईल.

ऑनलाईन अर्ज लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *