आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली जेवणासाठी पळसाच्या पानांची पत्रावळी आता विसरत चाललो आहे.
किती मोठ्या आणि चांगल्या गोष्ठी मागे सोडत चाललो आहे आपण बघा. पूर्वी पळसाच्या मोठ्या पानांची बांबूच्या बारीक शिळांच्या सहाय्याने गोलाकार शिवलेल्या पत्रावळीमध्ये लग्न समारंभामध्ये जेवण्यासाठी वाढून दिले जात होते.
माझ्या बालपणी लाग्न्यामध्ये जेवायला जाण्यासाठी पळसाच्या पानाच्या फोटोमध्ये दाखविल्या प्रमाणे पत्रावळ्या उपलब्ध असायच्या. या पत्रावळीची बुडाखाली दोनतीन बारीक दगडे आम्ही लावायचो जेणे करून त्यातील वरण पत्रावळीच्या बाहेर जाता कामा नये.
वांग्याची शाख, असलाच तर भात आणि वरण एकत्र मिसळू नयेत म्हणून खटाटोप असायचा. मीठ घ्यावयाचे झाल्यास ते मांडीवर किंवा कागदावर घ्यावे लागायचे कारण ते जर एकत्र मिसळले तर जेवणाची माझा जायची.
आताचा जर विचार केला तर आता प्लास्टिकच्या पत्रावळ्या आलेल्या आहेत. ज्यामध्ये थर्मोकोल मोठ्या प्रमाणत असते यामुळे आरोग्यास किती नुकसान आहे किंवा नाही हे डॉक्टरच योग्य सांगू शकतील मात्र पळसाच्या पानांच्या पत्रावळीमुळे आरोग्यास अजिबात धोका नव्हता हे सांगण्यासाठी तज्ञ व्यक्तीची गरज नाही.
सिंचन विहीर योजना 2024 संपूर्ण प्रस्ताव मोफत उपलब्ध sinchan vihir prastav
पळसाच्या पानांची पत्रावळी औषधी गुणधर्मे
पळसाच्या पानामध्ये औषधी गुणधर्म असतात यामुळे पचनशक्ती वाढून आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय पळसातील औषधी गुणधर्मामुळे काही आजारावर उपाय देखील होऊ शकतो.
सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पळसाची पाने विघटन करण्यास अत्यंत सोपी आहेत यामुळे पर्यावरणास कोणताही धोका उद्भवत नाही.
पळसाच्या पत्रावळीवर जेवल्यास अन्नाची चव टिकून राहते त्यात कसलाही बदल होत नाही.
पळसामध्ये लाघवी साफ करणे, स्थंभक, कोमेत्तेजक, अतिसार, कफक्षय, उदरवायू, शूळ, कृमी रक्तीमुळव्याध इत्यादी औषधी गुणधर्मे असतात.
प्लास्टिकची पत्रावळी
काही पत्रावळीवर केमिकलचा थर असतो हा त्या पत्रावळीचा उग्र वासच सांगून जातो. हल्लीच्या जीवनशैलीमध्ये की वयात अनेकांना विविध व्याधी जडत आहेत. प्रगतीच्या नावाखाली माणूस जीवाशी खेळत आहे.
प्लास्टिक विघटन करणे खूपच अवघड झाले असून यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. प्लास्टिकच्या पत्रावळ्या विघटनास अवघड असतात.
लग्न समारंभ झाल्यावर ग्रामीण भागामध्ये पत्रावळ्या जाळल्या जावू शकतात यामुळे यामधून निघणाऱ्या धुरामध्ये आरोग्यासाहित पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होते.
प्लास्टिक मुळात आरोग्य व पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने कमीत कमी याचा वापर करणे आवश्यक आहे.
आमचे Facebook page
पर्यावरण स्नेही पळसाच्या पत्रावळीचा उपयोग करावा
अजूनही फार म्हणता येईल असा उशीर झाला नाही. अजूनही आपण चांगल्या गोष्ठी अंगिकारू शकतो. याला फक्त वेळ आणि धाडस तेवढे पाहिजे.
जंक फूडमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने न जनतेही आज मोठ्या शहरामध्ये हाय प्रोफाईल व्यक्ती गावाकडील जीवनपद्धतीचा अवलंब होताना दिसत आहे किंबहुना हॉटेलमधील मेन्यूमध्ये तर गावाकडील भाजी भाकरी देखील आलेली आहे.
चुलीवरचे जेवण, कांदा भाकरी, डेगीतील कांदुरी मटन असे अनेक व्यंजनाची मागणी होताना दिसत आहे आणि नक्कीच हि चांगली बाब आहे.
जेवणामध्ये पत्रावळीचा उपयोग केला तर आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. पळसाच्या पानाच्या पत्रावळीमध्ये जेवल्यामुळे तुमचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय पर्यायवर चांगले राहील.
त्यामुळे लग्न असेल किंवा समारंभ यामध्ये मित्रांना परिवारांना पाहुण्यांना या पळसाच्या पानांची पत्रावळी महिमा नक्की सांगा.