नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात.
ज्या प्रमाणे केंद्र शासनाच्या किसान सन्मान निधीचे पैसे मिळतात आदि त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे वार्षिक ६ हजार रुपये देखील मिळतात.
६ व्या हफ्त्याचे वितरण आजपासून सुरु झाले आहे. तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत असतील तर नमो शेतकरी महा सन्मान निधीचे पैसे देखील लवकरच जमा होणार आहेत.
नमो किसान सन्मान निधीत वाढ शेतकऱ्यांना मिळणार आता 15 हजार रुपये
मिळविण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो का
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळतात त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे देखील आपोआप मिळतात.
पीएम किसान सन्मान निधीचा डाटा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी वर्ग करण्यात येतो त्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही.
तुम्हाला जर PM kisan sanman nidhi योजनेचे पैसे मिळत असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधीचा २ हजार रुपयांचा हफ्ता देखील विना अडथळा जमा होईल.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ६ व्या ह्फ्त्यापोटी २१६९ कोटी रुपयांचे वितरण DBT योजने अंतर्गत केले जाणार आहे. यामुळे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे.
महाराष्ट्रातील ९३.२६ लक्ष शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
नमो शेतकरी योजनेचे पैसे आले किंवा नाही कसे तपासावे
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे किती हफ्ते तुम्हाला मिळाले आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला तुम्ही भेट देवू शकता त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
https://nsmny.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
Beneficiary status या पर्यायावर क्लिक करा.
शेतकऱ्याने त्यांचा आधार नंबर टाकून कॅपचा कोड दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करावा.
आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाकताच तुम्हाला कळेल कि नमो शेतकरी योजनेचे किती हफ्ते तुम्हाला मिळाले आहेत.
तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळाला तरच या योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे सगळ्यात आधी पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळतो का याची शहानिशा करावी.
जर पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळत नसेल तर तुमच्या तालुक्यातील तहसील कार्याय्ली येथे संबधित अधिकारी यांना संपर्क साधावा.
या संदर्भातील अधिकृत माहिती खालील पेजवर बघू शकता.
कृषी विभाग फेसबुक लिंक