शासनाकडून गौण खनिज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
शेतात जाण्यासाठी शेत रस्ता करायचा असेल किंवा पाणंद रस्ता करायचा असेल अशावेळी असे रस्ते करतांना मुरूम त्याचप्रमाणे दगड म्हणजेच सोलिंग आवश्यक असते. आता अशा प्रकारचा मुरूम किंवा काळी माती मोफत मिळणार आहे.
महसूल व वन विभागाने या संदर्भात 3 एप्रिल २०२५ रोजी जी आर काढलेला आहे. या जी आर नुसार पाणंद रस्ते घरकुल आणि विहिरींच्या बांधकामासाठी खडी आणि माती रॉयल्टी फ्री करून देण्यात आले आहे.
या संदर्भातील शासन निर्णय देखील उपलब्ध आहे.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना शेतात जायला मिळणार रस्ता
शासनाकडून गौण खनिज मोफत शेत रस्त्यांसाठी होणार फायदा
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणत रस्ते निर्मिती केली जाणार आहे.
या पाणंद रस्ता निर्मितीसाठी मुरूम मोठ्या प्रमाणत लागतो अशावेळी या योजनेमुळे मोफत मुरूम मिळणार आहे.
सार्वजनिक गावतळे शेततळी तलाव व बंधाऱ्याचे काम करतांना मोठ्या प्रमाणत काळी माती निघते. हि काळी माती देखील आता शेतकऱ्यांना उपयोगात आणता येणार आहे.
या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणत शेत रस्ते निर्मितीसाठी चलना मिळणार असल्याचे मत महसूल मंत्री यांनी व्यक्त केले आहे.
शासनाने गौण खनिज जरी मोफत उपलब्ध करून दिले असले तरी याची वाहतूक मात्र शेतकऱ्यांना स्वखर्चाने करावी लागणार आहे.
विहीर व घर बांधकामासाठी होणार उपयोग
रोजगार हमी योजनेतून सध्या अनेक ठिकाणी सिंचन विहिरींचे काम मोठ्या प्रमाणत होत आहे. विहीर खोदकाम झाल्यानंतर त्याचे बांधकाम देखील करावे लागते.
विहीर बाधकाम केल्यानंतर विहिरीच्या कड्याच्या बाजूला मुरूम किंवा माती टाकून भरती भरावी लागते यासाठी शेतकऱ्यांना अधिकच खर्च करावा लागतो.
तुम्हाला देखील सिंचन विहिरीचा लाभ मिळाला असेल तर या योजनेचा लाभ मिळू शकतो, मात्र तुम्हाला अजूनही ५ लाख रुपये किमतीची सिंचन विहीर मंजूर झाली नसेल तर त्यासाठी अर्ज करा, त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.
आता मात्र मोफत गौण खनिज योजनेमुळे शेतकऱ्यांना हा मुरूम मोफत मिळणार आहे.
अशाच पद्धतीने घरकुल बांधकाम करतांना देखील मोठ्या प्रमाणत मुरूम लागतो तो देखील तुम्हाला आता मोफत मिळणार आहे.
या संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.