निराधार असल्याचा दाखला काढा काही मिनिटांत विविध सेवांसाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे सुरु करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

निराधार असल्याचा दाखला काढा काही मिनिटांत विविध सेवांसाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे सुरु करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

निराधार असल्याचा दाखला ऑनलाईन पद्धतीने कसा काढावा या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

आपले सरकार या सेवा पोर्टलवर ५२७ सेवा उपलब्ध आहेत. सर्वसामान्य माणूस या सेवांसाठी अगदी घरी बसून देखील अर्ज करू शकतो. यापैकीच एक सेवा म्हणजे निराधार असल्याचा दाखला मिळविणे होय.

तुम्ही किंवा तुमच्या मित्रपरिवारातील एखादा सदस्य निराधार असेल तर अशावेळी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी निराधार दाखला आवश्यक असतो.

हा दाखला काढण्यासाठी आता कोठेही जाण्याची गरज नाही अगदी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हा निराधार दाखला काढू शकता.

या संदर्भातील संपूर्ण माहिती कशी आहे हे आपण या ठिकणी जाणून घेणार आहोत.

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड construction labor smart card 2024

का आवश्यक असतो निराधार असल्याचा दाखला

सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा दाखला काढण्याची आवश्यकता काय आहे. ज्या व्यक्ती निराधार आहेत त्यांच्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरु असतात.

जसे कि संजय गांधी निराधार योजना. केवळ हीच योजना नव्हे तर इतरही योजनेचा लाभ घेण्यासाठी हा दाखला आवश्यक असतो.

हा निराधार असल्याचा दाखला नसेल तर शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही.

कसा काढावा निराधार असल्याचा दाखला

दाखला काढण्यासाठी पूर्वी ऑनलाईन सेंटरवर किंवा ग्रामपंचायतमध्ये जावे लागत होते. परंतु वृद्धपकाळाने अनेक नागरिकांना प्रवास करणे शक्य होत नाही. अशावेळी अगदी आपले सरकार पोर्टलवर तुम्ही या दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

आपले सरकार या पोर्टलवर सर्वसामान्य नागरिक विविध सेवांसाठी अर्ज करू शकतात. आता हे पोर्टल अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश नुकतेच दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

यामुळे अनेक सुविधांचा लाभ नागरिकांना अगदी घरबसल्या घेता येणार आहे.

घरबसल्या करा रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी मोबाईलद्वारे

कसा करावा ऑनलाईन अर्ज

आपले सरकार पोर्टलवर नागरिकांना अनेक सेवांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. यासाठी सुरुवातील ऑनलाईन नोंदणी करावी लागते.

ऑनलाईन नोंदणी झाली कि मग वापरकर्त्याला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो. हा आपले सरकार युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगीन करावे लागते.

एकदा का अर्जदाराने लॉगीन केले कि मग आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध असलेल्या हव्या त्या योजनेसाठी अर्ज सादर करता येतो.

एखाद्या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

आपले सरकार वेबसाईट लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *