1 रुपयात पिक विमा बंद झाला असून सुधारित पिक विमा योजनेस मंत्री मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना १ रुपयात पिक विमा संरक्षण मिळत होते आता मात्र यापुढे शेतातील पिकांचा पिक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण पिक विमा रकमेच्या ५ टक्क्यापर्यंत रक्कम भरावी लागणार आहे.
खरीप हंगामातील पिकांचा पिक विमा उतरावयाचा असेल तर त्यासाठी २ टक्के, रब्बी हंगामातील पिकांसाठी १.५ टक्के तर नगदी पिकांसाठी ५ टक्के एवढी रक्कम शेतकऱ्यांना पिक विम्यापोटी भरावी लागणार आहे.
काल दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार आहे.
घरकुल योजना यादी बघा या लोकांना मिळणार लाभ.
1 रुपयात पिक विमा बंद कसे असेल नव्या पिक विम्यासाठी नवीन स्वरूप
२०१६ पासून संपूर्ण देशामध्ये प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाने केवळ पिक कापणी प्रयोग आधारित भरपाई हा ट्रिगर अनिवार्य केलेला आहे.
मात्र महाराष्ट्र राज्य सरकारने यामध्ये अजून ४ पिक विमा संरक्षण ट्रिगर समाविष्ट केले होते. यामुळे विमा हप्त्याच्या रकमेत वाढ झाली त्यामुळे अर्थातच राज्य सरकारचा विमा हफ्ता अनुदानावरील रकमेत देखील वाढ झाली.
आता केवळ पिक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान होणार आहे.
खालील व्हिडीओ पहा.
कसे मिळत होते पिक विमा संरक्षण
1 रुपयात पिक विमा बंद झाला आहे यापुढे विम्याचे स्वरूप वेगळे असणार आहे. आतापर्यंत प्रधानमंत्री फसल बिमा योजनेतून खालील पिक विमा संरक्षण ट्रिगर शेतकऱ्यांसाठी दिले जात होते.
- पेरणीच न होणे. पेरणी केल्यानंतर जर दुष्काळ पडला यामध्ये पिक उगलेच नाही तरी देखील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत होती.
- स्थानिक नैसर्गिक आप्पती. यामध्ये अतिवृष्टी झाली किंवा गारपीटीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले अशावेळी या ट्रिगरद्वारे पिक विमा सरंक्षण मिळत होते.
- हंगामातील प्रतिकूल परिस्थिती. चालू हंगामामध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर नुकसानभरपाई मिळत होती.
- काढणी पश्चात नुकसान. यामध्ये पिकांची सोंगनी केल्यानंतर अतिवृष्टीमुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले तर अशावेळी पिक विमा मिळत होता.
- पिक कापणी प्रयोग. यामध्ये देखील पिक विमा मिळत होता.
यापैकी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या दोन ट्रिगरमधून शेतकऱ्यांना भरपूर फायदा होत होता. आता या सर्व पिक विमा ट्रिगर बंद करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
अशा ५ ट्रिगरद्वारे पिक विमा संरक्षण मिळत होते आता मात्र केवळ पिक कापणी प्रयोग आधारित नुकसानभरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.