लाडक्या बहिणींना व्यवसाय उभारणीसाठी 40 हजार रुपये कर्ज मिळणार

लाडक्या बहिणींना व्यवसाय उभारणीसाठी 40 हजार रुपये कर्ज मिळणार

महिलांसाठी आनंदाची बातमी व्यवसाय सुरु करण्यासाठी 40 हजार रुपये कर्ज मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळतात. यामध्ये अजून ६०० रुपयांची वाढ शासनाने घोषित केली असून ती देखील लवकरच मिळणार आहे.

आणखी एक सुखद बातमी म्हणजे लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 40 हजार रुपये कर्ज देखील मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे.

लाडकी बहिण योजनेमुळे विद्यमान सरकार सत्तेत आले आहे यामुळे लाडकी बहिण योजना अधिक मजबूत होतांना दिसत आहे. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना आता व्यवसाय उभारणीसाठी ४० हजार रुपये कर्ज मिळणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मिळणाऱ्या हफ्त्यातून केली जाणार कर्जाची परतफेड

उद्योग व्यवसाय उभारणीसाठी 40 हजार रुपये कर्ज दिल्यानंतर या कर्जाची परतफेड लाडकी बहिण योजना अंतर्गत मिळणाऱ्या हफ्त्यातून केली जाणार आहे.

ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांना केवळ कर्ज न मिळाल्याने त्या त्यांचा व्यवसाय सुरु करू शकत नाही. आता लाडकी बहिण योजना अंतर्गत मिळणाऱ्या 40 हजार रुपये कर्जाच्या सहाय्याने छोटा मोठा व्यवसाय सुरु करण्यास मदत मिळणार आहे.

तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी असेल तर त्यांना हि माहिती सांगा जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजना कागदपत्रे

कशी राबविली जाणार योजना

लाडकी बहिण कर्ज योजना कशी राबविली जाणार आहे या संदर्भात लवकरच सूचना येतील सध्या तरी या योजनेविषयी एवढीच माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

चव्हाणवाडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी हि माहिती दिलेली आहे. या संदर्भातील बातमी वाचण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

बातमी पहा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून अनेक महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. 1500 वरून आता लवकरच महिन्याला २१०० महिलांना मिळणार आहे. यामध्ये आता व्यवसाय करण्यासाठी 40 हजार रुपये कर्ज मिळणार असल्याची बातमी समोर आल्याने अनेक महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक महिलांना मिळत नाही लाडकी बहिण योजनेचा हफ्ता

ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा हफ्ता मिळत आहे त्यांना 40 हजार रुपये कर्ज देखील मिळणार आहे परंतु ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा हफ्ता मिळत नाही त्यांना मात्र या कर्ज योजनेचा लाभ मिळणार नाही.

त्यामुळे तुम्हाला देखील लाडकी बहिण योजनेचा हफ्ता मिळत असल्याची खात्री करा. लाडकी बहिण योजनेचे काही हफ्ते मिळाले आणि मध्येच हफ्ते जमा होणे बंद झाले अशी अनेक उदारणे आहेत.

लाडकी बहिण योजना 2100 रुपये मिळणार पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल

याचे कारण म्हणजे शासनाने लाडकी बहिण योजनेसाठी नियम व अटी कडक केल्या आहेत उदाहरणार्थ घरातील सदस्यांच्या नवे चारचाकी वाहन असेल किंवा कोणी कर भरत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे.

परंतु तुम्ही पात्र असूनही तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा हफ्ता मिळणे बंद झाले असेल तर लगेच या संदर्भात तुमची तक्रार सादर करून द्या.

तक्रार सादर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

तक्रार दाखल करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *