अशा पद्धतीने अगदी काही मिनिटांत करा बांधकाम कामगार अर्ज मंजूर

अशा पद्धतीने अगदी काही मिनिटांत करा बांधकाम कामगार अर्ज मंजूर

बांधकाम कामगार विभागाच्या वतीने ज्यांची नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अनेक कामगार बांधकाम कामगार नोंदणी करतात अर्ज कामगार विभागाडून स्वीकरला देखील जातो परंतु जो पर्यंत अर्ज सक्रीय होत नाही तो पर्यंत कोणत्याही बांधकाम कामगार संबधित कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येत नाही.

बांधकाम कामगार अर्ज सक्रीय करण्यासाठी केवळ १ रुपया ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो. हि संपूर्ण प्रोसेस कशी आहे समजून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

शेळी गट वाटप 2025 गाय म्हैस कुक्कुटपक्षी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

असा करा अर्ज सक्रीय

महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर या.

तुम्हाला जी भाषा सोपी वाटत असेल ती भाषा निवडा.

वेबसाईटला थोडे खाली स्क्रोल करा. बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगीन करा या बटनावर क्लिक करा.

आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसिड टू फॉर्म या बटनावर क्लिक करा.

मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीत टाकून validate otp या बटनावर क्लिक करा.

सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

अर्ज सक्रीय करण्यासाठी पेमेंट करण्याची पद्धत

वेबसाईटवर लॉगीन केल्यानंतर Basic Details या पर्यायामध्ये Application Status Accept दिसत असेल आणि Registration status inactive असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या कोणत्याही योजनेसाठी अर्ज सादर करता येणार नाही.

मग आता यावर पर्याय काय आहे तर सर्वात शेवटी Payment Details हा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. या ठिकाणी पेमेंट करण्याची लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने १ रुपया पेमेंट करा.

पेमेंट करण्यासाठी पेमेंट डीटेल्स या बटनावर क्लिक करा.

परत एकदा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करा.

दिलेल्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp तो दिलेल्या चौकटीत टाका आणि नंतर validate otp या बटनावर क्लिक करा.

आता पेमेंट करण्याचे विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा. या ठिकाणी इंटरनेट बँकिंगसह क्यूआर कोडद्वारे देखील तुम्ही पेमेंट करू शकता.

कामगार विभागाची अधिकृत वेबसाईट लिंक

नूतनीकरण आणि पैसे भरल्याची पावती प्रिंट किंवा जतन करून घ्या

१ रुपयाचे यशस्वीपणे पेमेंट झाल्यानंतर Application Status व Registration status या दोन्ही पर्यायासमोर हिरव्या रंगामध्ये Accept असे  दिसत असल्यास तुमचा अर्ज सक्रीय झाला आहे असे समजा.

पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज सक्रीय झाला आहे का ते पाहण्यासाठी तुमचा आधार आणि मोबाईल नंबर टाकून परत एकदा लॉगीन करा.

आता पहा या ठिकाणी Application व Registration status या दोन्ही पर्यायासमोर हिरवा रंगाने accept दिसेल.

पेमेंट आणि नूतनीकरण केल्याची पावती प्रिंट करण्यासाठी परत एकदा पेमेंट डीटेल्स या पर्यायावर क्लिक करा.

print cash receipt व print renewal receipt असे दोन पर्याय दिसतील यावर आळीपाळीने क्लिक करून या पावत्या प्रिंट करून घ्या.

कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर सेव्ह as pdf करून घ्या जेणे करून भविष्यामध्ये तुम्हाला या पावत्यांची गरज पडली तर त्या तुमच्यासाठी मदतीच्या ठरेल.

अशा पद्धतीने बांधकाम कामगार अर्ज सक्रीय कसा करावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना

राज्यातील नोंदणीत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवीत असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार योजना संदर्भातील नोंदणी कशी करावी या संदर्भातील माहिती जाऊन घेवून त्या पद्धतीने लगेच तुमची ऑनलाईन नोंदणी करून घ्या.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सरकारी ठेकेदार यांच्याकडे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हवे असते. या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही आणि शिक्का आवश्यक असतो.

आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो आणि स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *