गटई कामगार योजना 2025 अंतर्गत ऑफलाईन अर्ज सुरु झाले असून पात्र लाभार्थींनी त्यांचे अर्ज लवकरात लवकर सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत.
गटई कामगार योजना gatai stall yojana 2025 – या योजने अंतर्गत गटई कामगारांना ऊन वारा पाऊस यापासून सरंक्षण व्हावे त्याच प्रमाणे त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून १०० टक्के अनुदानावर हि योजना राबविली जाते.
योजनेचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून एक लक्ष्यांश ठरविला जातो आणि त्यानुसार पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ दिला जातो.
प्रत्येक वर्षी गटई कामगार योजना राबविली जाते यावर्षी देखील हि योजना राबविली जात असून योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गटई कामगार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
सामाजिक न्याय विभागाकडून हि योजना राबविली जाते. योजनेचे अर्ज ऑफलाईन आहे. अर्जाचा नमुना संबधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात मिळेल. गटई स्टॉल योजना अर्ज pdf हवा असल्यास खालील बटनावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.
वरील गटई स्टॉल योजना अर्ज pdf अर्ज डाउनलोड करून घेतल्यानंतरप्रिंट करून घ्या. या अर्जामध्ये सविस्तर माहिती भरा.आणि तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात जमा करा.
केवळ अनुसूचित जाती प्रवर्गातील चर्मकार समाजातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात.
अर्ज कसा सादर करायचा कागदपत्रे कोणकोणती लागतात या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ नक्की पहा.
गटई कामगार योजना 2025 साठी लागणारे कागदपत्रे
अर्जदाराला गटई कामगार योजना 2025 साठी अर्ज सादर करतांना काही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात ती खालीलप्रमाणे आहे.
- अर्थात हि योजना केवळ चर्मकार प्रवर्गासाठी असल्याने अर्जदाराला जातीचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे.
- तहसीलदार यांचा किंवा तत्सम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला.
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला.
- राशनकार्डची झेरॉक्सप्रत.
- अर्जदार ज्या ठिकाणी स्टॉल उभारू इच्छित असेल त्या ठिकाणचे भाडे करार किंवा भादेचीठ्ठी.
- गटई काम करत असल्याचे छायाचित्र किंवा दाखला.
गटई स्टॉल योजना पात्रता
अर्जदाराला जर गटई स्टॉल योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असले तर त्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे.
केवळ अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदाराला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे, त्यातही तो चर्मकार प्रवर्गातील असावा.
अर्जदाराकडे महाराष्ट्रामध्ये राहत असल्याचे रहिवाशी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
अर्ज सादर करतांना अर्जदाराचे वय कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ५० वर्षे असावे.
अर्जदाराला संबधित व्यवसायासंबधी ज्ञान असावे.
ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न ९८००० हजार रुपये तर शहरी भागासाठी १ लाख २० हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे.
अशा प्रकारे पात्र अर्जदार गटई स्टॉल योजना gatai stall yojana अंतर्गत अर्ज सादर करू शकतात. हि योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील चर्मकार सामासाठी रस्त्याच्या बाजूला दुकान टाकण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून पत्र्याचे स्टॉल १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. समाज कल्याण विभागामध्ये निशुल्क मिळतो. या लेखामध्ये देखील अर्जाचा नमुना pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.