जाणून घेवूयात लाडकी बहिण कर्ज योजना संदर्भातील सविस्तर माहिती.
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना 0 टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
दिनांक 19 जून 2025 रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना 9 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.
त्याहीपुढे जावून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने 0 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणीचे पैसे आले नसेल तर पहा का नाही आले असे करा चेक
लाडकी बहिण कर्ज योजनेचा उद्देश
ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा नियमित लाभ मिळत आहे अशा महिलांनी एकत्र येवून एकदा उद्योग व्यवसाय सुरु केल्यास बेरोजगारीवर मात करता येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना मिळत असललेल्या हफ्त्यातून या कर्जाचे हफ्ते कपात केले जाईल. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या घरातील किंवा मित्र परिवारातील एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल तर त्यांना लाडकी बहिण कर्ज योजनेची माहिती नक्की कळवा.
ग्रामीण भागातील अनेक महिलांना आपला उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. अशावेळी 0 टक्के व्याजदराने मिळत असलेल्या या कर्ज योजनेचा उद्योग व्यवसाय उभारणीस नक्कीच मदत होईल.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा 2025
सध्या मुंबई शहर आणि उपनगरातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज 0 टक्के व्याजदराने मिळणार आहे. हे कर्ज मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने दिले जाणार आहे.
मुंबई शहर व उपनगरामध्ये सध्या 16 लाख लाभार्थी आहेत. हि योजना सध्या केवळ मुंबई शहर व उपनगरासाठी सीमित आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू होऊ शकते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हि योजना लागू झाल्यास अनेक महिलांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी या योजनेमुळे फायदा मिळणार आहे.
या योजनेतून मुंबईतील महिला वैयक्तिक किंवा सामुहिक कर्ज घेवून आपला उद्योग व्यवसाय सुरु करू शकतात.
लाडकी बहिण कर्ज योजनेचे स्वरूप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कर्ज योजनेचे थोडक्यात स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
योजनेचे नाव | लाडकी बहिण कर्ज योजना 2025 |
पात्रता | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी. |
किती मिळणार कर्ज | १ लाख रुपये |
कर्जाचे स्वरूप | वैयक्तिक किंवा सामुहिकरित्या |
योजनेचा उद्देश | उद्योग किंवा व्यवसाय सुरु करणे |
व्याजदर | 0 टक्के |
लक्षात घ्या कि सध्या हि योजना केवळ मुंबई शहर व उपनगरामध्ये सुरु आहे.