महाडीबीटी योजनांचा लाभ घ्यायचा आहे पण फार्मर आयडी माहित नाही? असा शोधा फार्मर आयडी

महाडीबीटी योजनांचा लाभ घ्यायचा आहे पण फार्मर आयडी माहित नाही? असा शोधा फार्मर आयडी

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी असा शोधा फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक.

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. केवळ महाडीबीटीच नव्हे तर यापुढे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्रासाठी सीएससी किंवा महा ऑनलाईन सेंटरवर ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत.

परंतु जेंव्हा महाडीबीती पोर्टल असेल किंवा पोकरा योजनेचे पोर्टल असेल या ठिकाणी अर्ज करतांना अनेक शेतकरी बांधवाजवळ फार्मर आयडी नसतो. अशावेळी अर्ज करतांना अडचण निर्माण होते.

असा शोधा फार्मर आयडी

शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी अगदी सोप्या पद्धतीने शोधता येतो यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • महाडीबीटी शेतकरी वेबसाईटवर जा.
  • वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडा.
  • शेतकरी आयडी प्रविष्ट करा असा चौकोन दिसेल.
  • चौकोनाखाली तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा अशी लाल रंगाची लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये आधार नंबर टाका.
  • आधार नंबर टाकल्यानंतर otp येईल तो दिलेल्या चौकटीत टाका.
  • otp तपासा या बटनावर क्लिक करताच एका नवीन विंडोमध्ये फार्मर आयडी दिसेल तो सेव्ह करून घ्या.

वरील पद्धतीचा अवलंब करून तुम्ही महाडीबीटी वेबसाईटवरच शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेवू शकता. सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

नवीन फार्मर आयडीसाठी अर्ज कसा करावा

वरती सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी आवश्यक असणार आहे. हा फार्मर आयडीसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर लगेच करून द्या.

फार्मर आयडी शेतकरी स्वतः काढू शकतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

सीएससी सेंटरवर जावून देखील तुम्ही तुमचा शेतकरी ओळख क्रमांकासाठी अर्ज सादर करू शकता. शेतकरी आयडीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

फार्मर आयडी असे करा डाउनलोड 2025 पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना

तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल तर त्याद्वारे लॉगीन करून विविध योजनांसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

टॅक्टर.

पॉवर टिलर.

बैलचलित औजारे.

मनुष्यचलित औजारे.

बियाणे, खते.

ठिबक, तुषार.

रोपवाटिका.

या आणि अशा कितीतरी योजनांसाठी शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. नवीन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २३.६० एवढे शुल्क भरावे लागते.

Mahadbt portl link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *