नोंदणीत जिवंत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच म्हणजेच Bandhkam kamgar essential kit मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे.
ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी केलेली आहे त्याच बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.
आता यामध्ये सुधारित अत्यावश्यक संच योजनेची भर पडलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे आणि कसा करावा शिवाय या अत्यावश्यक संचामध्ये कोणकोणते साहित्य असणार आहे या संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच Essential kit संचामधील साहित्य
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगारांना सुधारित अत्यावश्यक संच मिळणार आहे यामध्ये खालील 10 साहित्य असणार आहे.
- पत्र्याची पेटी.
- प्लास्टिकची चटई.
- धान्य साठवणूक करण्याची कोठी. २५ किलो क्षमता
- दुसरी धान्य साठवणूक कोठी २२ किलो क्षमता असलेली.
- १ बेडशीट.
- एक चादर.
- १ ब्लँकेट.
- साखर ठेवण्यासाठी १ किलो क्षमता असलेला डबा.
- ५०० ग्रॅम साठवणूक क्षमता असलेला चहाचा डबा.
- १८ लिटर क्षमता असलेले पाणी फिल्टर.
वरील प्रकारचे साहित्य जीवनावश्यक संचामध्ये असणार आहे.
अर्ज कसा करावा लागेल
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे बांधकाम कामगार म्हणून अर्जदाराची नोंदणी आवश्यक असणार आहे. नोंदीत बांधकाम कामगार यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज बांधकाम कामगार कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
हा जीवनावश्यक संच पुरवठा करण्यासाठी शासन इ निविदा प्रक्रिया राबविणार आहे. बांधकाम कामगार विभागाकडून नोंदीत अनुभवी व नामांकित संस्थेकडून हे कीट बांधकाम कामगारांना वितरीत केले जाणार आहे. येणार आहे.
अर्जाचा नमुना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम कामगार कार्यालयात उपलब्ध होईल. या अर्जामध्ये सविस्तर माहिती भरून अर्ज सादर करून द्यायचा आहे.
दलालांपासून सावधान
बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक बांधकाम कामगारांकडून अधिकचे पैसे घेतल्याचे अनेक उदाहरणे आहे. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही जर कोणी पैसे मागत असेल तर त्याची बांधकाम कामगार विभागाकडे तक्रार करा.
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी केवळ १ रुपया खर्च येतो. हि नोंदणी अगदी मोबाईलद्वारे देखील करता येवू शकते. नोंदणी करण्यासाठी ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.
त्यामुळे बांधकाम कामगार योजनेसाठी कोणी पैसे मागत असेल तर देवू नका. कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच योजनेच्या अधिक माहितीसाठी कामगार कार्यालयास भेट देवू शकता.
बांधकाम कामगार योजनेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दक्षता पथके
योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी बांधकाम कामगार मंडळास प्राप्त झाल्याने यापुढे आता योजनेची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता तपासणी पथके पाठविली जाणार आहे.
बांधकाम कामगार योजनेसाठी कोणी पैसे मागत असेल तर अर्जदार या पथकाकडे देखील तक्रार करू शकतो.
अशाच प्रकारे भांडे योजनेचा लाभ देखील बांधकाम कामगारांना मिळतो. भांडे योजना संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा 2025
जीवनावश्यक संचामध्ये १० प्रकारच्या वस्तू मिळणार असून यामध्ये पाणी फिल्टर धान्य साठवणुकीसाठी कोठी व इतर साहित्य मिळणार आहे.
बांधकाम कामगार कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावा. ऑफलाईन अर्जाचा नमुना कार्यालयातच उपलब्ध होईल.