जाणून घेवूयात भांडे योजना ऑनलाईन अर्ज प्रोसेस संदर्भातील सविस्तर माहिती.
बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या साईटवर काम करण्यासाठी स्थलांतर करावे लागते. अशावेळी त्यांना भोजना तयार करण्यासाठी शासनाकडून गृहपयोगी संच योजना अंतर्गत मोफत भांडे दिले जातात.
बांधकाम कामगारांना भांडे योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. शासनाच्या २०२१ च्या जीआर नुसार नोंदीत बांधकाम कामगारांना भांडे योजनेचा लाभ दिला जातो.
गृहपयोगी संच असे या योजनेचे नाव असून यामध्ये विविध प्रकारे भांडे बांधकाम कामगारांना देण्यात येतात.
पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड करा ऑनलाईन pm vishwakarma identity card download 2025
बांधकाम कामगारांना या भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. बांधकाम कामगार भांडे योनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करतात या संदर्भात या लेखामध्ये व्हिडीओ देण्यात आलेला आहे.
हा व्हिडीओ बघून अर्जदार भांडे योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
बांधकाम कामगार भांडे योजना संक्षिप्त माहिती
बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी पात्रता आणि थोडक्या माहिती खालीलप्रमाणे आहे.
- बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक.
- गृहपयोगी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येते.
- नोंदणी करण्यासाठी केवळ १ रुपया खर्च येतो.
- कामगारांनी नोंदणी केल्यानंतर विविध योजनेसाठी अर्ज करता येतो. गृहपयोगी संचासाठी वेगळा अर्ज सादर करावा लगतो. ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक.
- बांधकाम कामगारास ३० भांड्यांचा संच मिळतो.
अजूनही बरेच कामगार योजनेपासून वंचित
राज्यातील बऱ्याच बांधकाम कामगारांनी त्यांची ऑनलाईन नोंदणी न केल्याने अशा बांधकाम कामगारांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
बांधकाम कामगार गृहपयोगी संच मिळविण्यासाठी अनेक बोगस कामगारांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घेतला असल्याच्या तक्रारी बांधकाम कामगार मंडळास प्राप्त झालेल्या आहेत्त. त्यामुळे अशा बोगस बांधकाम कामगारांची नोदंनी तपासण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडून दक्षता पथके तैनात करण्यात आलेले आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दक्षता पथक तपासणी करणार असल्याने बोगस बांधकाम कामगारांना या या योजनेतून वगळले जाणार असल्याने आता खरोखरच्या बांधकाम कामगारांना अधिक लाभ मिळणार आहे.
ज्या महिला बांधकाम कामगार आहेत त्या या भांडे योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असून आता त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अधिक सोपे होणार आहे.
बांधकाम कामगार ऑनलाईन भांडे अर्ज प्रोसेस
बांधकाम कामगार योजनेतील भांडे योजना हि सर्वात लोकप्रिय योजना असल्याने अनेक बांधकाम कामगार या योजनेसाठी लाभ घेवू इच्छित असतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये खालील माहिती सादर करावी लागते.
नोंदणी क्रमांक.
दिनांक.
नूतनीकरण दिनांक.
मोबाईल नंबर.
आधार नंबर.
अर्जदाराचे नाव वडिलांचे नाव आडनाव.
camp निवडा.
इत्यादी माहिती बांधकाम कामगार योजनेतील ऑनलाईन अर्जामध्ये सादर करावी लागते. भांडे योजना ऑनलाईन अर्ज संबधित माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
बांधकाम कामगार भांडे योजना जी आर लिंक
बांधकाम कामगार भांडे योजना संक्षिप्त
योजनेचे नाव. | गृहपयोगी संच योजना. |
लाभार्थी पात्रता. | बांधकाम कामगार. |
अर्ज पक्रिया. | ऑनलाईन |
किती मिळणार भांडे | ३० नग |
गृहपयोगी संच जी आर | जी आर लिंक |
ऑनलाईन अर्ज लिंक | लिंक |
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
गृहपयोगी संच अर्थात भांडे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर करावा लगतो या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.