बिरसा मुंडा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. बिरसा मुंडा योजना अंतर्गत विविध योजनांसाठी पात्र लाभार्थी अर्ज सादर करू शकतात. या योजना अंतर्गत कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
या योजना अंतर्गत विविध उपयोजनांसाठी अर्ज सादर करता येतो. सध्या या योजनेसाठी अर्ज सुरु झालेले असून अर्ज पद्धत ऑनलाईन आहे.
बिरसा मुंडा क्रांती योजनेसाठी तुम्ही जर पात्र लाभार्थी असेल तर तुमचा अर्ज महाडीबीटी वेबसाईटवर सादर करून द्या.
अर्ज कसा सादर करावा लाभार्थी कोण आहेत कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे या संदर्भातील सखोल माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
बिरसा मुंडा अंतर्गत कोणत्या योजनेसाठी किती मिळणार अनुदान?
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनेक योजनांसाठी लाभार्थी अर्ज सादर करू शकतात. त्या योजना खालीलप्रमाणे
- नवीन विहीर खोदकाम करण्यासाठी ४ लाख रुपये.
- जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाख रुपये.
- शेततळे प्लास्टिक अस्तरीकारणासाठी २ लाख रुपये.
- पंपसेटसाठी वीज जोडणी २० हजार रुपये.
- ठिबक सिंचन संचासाठी ९७ हजार रुपये.
- डीझेल पंपासाठी ४० हजार रुपये.
- पीव्हीसी पाईप ५० हजार रुपये.
- परस बागेसाठी ५ हजार रुपये
वरीलप्रमाणे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदान दिले जाते. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच महाडीबीटी वेबसाईटवर तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.
रोजगार हमी योजना विहिरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
बिरसा मुंडा कृषी क्रांती लाभार्थी पात्रता
या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराकडे अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
- विहिरीसाठी ४० गुंठे आणि इतर प्रकल्पांसाठी २० गुंठे जमीन असणे आवश्यक आहे.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा १.५० लाखापेक्षा कमी असावी.
- उत्पन्नाचा दाखला असणे बंधनकारक.
- एकदा योजनेचा लाभ घेतल्यानंतर लाभार्थीस किंवा लाभार्थीच्या कुटुंबास ५ वर्षे लाभ घेतला जाणार नाही.
वरील प्रमाणे योजनेसाठी पात्रता आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.
- अर्जदाराचा जातीचा वैध दाखला.
- सातबारा व ८ अचा उतारा.
- उत्पन्नाचा दाखला.
- ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर प्रतिज्ञापत्र.
- तलाठी यांचा दाखला.
वरीलप्रमाणे अजून इतर कागदपत्रे देखील या योजनेसाठी आवश्यक असतात. कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.