प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 2025 PM-Kisan sanman nidhi.
आताची अपडेट माहिती – प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २ हजार रुपयांचा २०वा हफ्ता (२०२५) तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला कि नाही कसे तपासावे.
हा हफ्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नसेल तर का झाला नाही अर्थात स्टेट्स कसे चेक करावे पहास सविस्तर माहिती.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार प्रदान करते.
या योजनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक रु. 6,000/- ची आर्थिक मदत मिळते, जी रु. 2,000/- च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात (DBT – Direct Benefit Transfer) जमा केली जाते.
किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता नुकताच म्हणजेच 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला, ज्यामध्ये 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रु. 20,500 कोटी वितरित करण्यात आले आहेत.
तुम्हाला जर हा हफ्ता मिळाला नसेल तर का मिळाला नाही याचे कारण या लेखामध्ये आपण शोधणार आहोत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 2025 असे तपासा पैसे आले आहेत की नाही
PM-Kisan अधिकृत पोर्टल वापरून
- वेबसाइटवर जा: pmkisan.gov.in
- त्यानंतर Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.
- Know Your Status वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक अथवा खाते दिलेल्या चौकटीत टाका.
- नोंदणीकृत मोबाइलवर येईल तो दिलेल्या चौकटीत टाका.
- तुमची पात्रता, मागील पेमेंट स्टेटस व तारीख दिसेल.
अशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे किती हफ्ते मिळाले या संदर्भात सविस्तर माहिती मिळेल.
पैसे जमा झाले नसतील तर या उपाय योजना करा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 2025 2 हजार रुपयांचे हफ्ते नियमित मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची ekyc करणे गरजेचे आहे, ती करून घ्या.
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जो बँक खाते क्रमांक दिला आहे तो बरोबर असल्याची खात्री करा. जसे कि बँकेचा खाते क्रमांक, ifcs कोड व आधार नंबर बँकेला लिंक आहे का हे देखील तपासा.
जर असे नसेल तर यामुळे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे न जमा होण्याचे कारण असू शकते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे गुगल प्ले स्टोअरवर अधिकृत ॲप देखील उपलब्ध आहे. यावर देखील शेतकरी त्यांचे स्टेट्स चेक करू शकतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 2025 संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
pmkisan.gov.in वर जाऊन “Know Your Status” वर क्लिक करा, तुमची माहिती भरा आणि OTP टाकून तुमचे पेमेंट स्टेटस तपासा. मोबाईलवरही SMS येतो.
मची पात्रता पुन्हा तपासा. जर पात्र असाल आणि नाव नसल्यास, नजीकच्या CSC केंद्रावर जाऊन अर्जामध्ये सुधारणा करता येते किंवा तालुका कृषी अधिकारी/ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा.
लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात:
आधार कार्ड
७/१२ उतारा किंवा जमीन दस्त
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
e‑KYC पूर्ण केलेले असणे
याचे मुख्य कारण म्हणजे तुमचा अर्ज पूर्ण न झालेला असणे, आधार क्रमांक चुकीचा असणे, किंवा e‑KYC न केलेले असणे. या त्रुटी CSC केंद्रावर जाऊन किंवा तहसील/ कृषी कार्यालयात जावून दुरुस्त करता येतात.