थेट कर्ज योजना 2025 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आली आहे. या योजना संदर्भात आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ग्रामीण भागामधील नागरिकांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने थेट कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याद्वारे ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करू शकतात.
या योजेंचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती लागते, कागदपत्रे, अर्ज कोठे आणि कसा करावा, कर्ज कसे मिळेल या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे लेख संपूर्ण वाचा.

बिरसा मुंडा कृषी योजना
बिरसा मुंडा कृषी योजना – अर्ज प्रक्रिया,पात्रता आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती येथे वाचा.
अधिक वाचा →थेट कर्ज योजना 2025 योजनेतून कोणते व्यवसाय सुरु करता येईल?
योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी हे बघणे महत्वाचे आहे कि थेट कर्ज योजना 2025 या योजनेतून कोणकोणते व्यवसाय करता येतील.
- मोबाईल सर्विसिंग व रिपेरिंग.
- इलेक्ट्रिशियन.
- इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेरिंग उदाहरणार्थ फ्रिज, एसी, टीव्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर हार्डवेअर इत्यादी.
- ब्युटी पार्लर.
- ड्रेस डिझायनिंग.
- टेलरिंग.
- फूड प्रॉडक्ट किंवा प्रोसेसिंग.
- किराणा दुकान.
- जनरल किंवा स्टेशनरी स्टोअर.
- मेडिकल स्टोअर.
- फॅब्रिकेशन किंवा वेल्डिंग.
- हार्डवेअर व सॅनिटरी शॉप.
- प्रिंटिंग.
- शिवणकला.
- झेरॉक्स लॅमिनेशन.
- हॉटेल/केटरिंग सर्विसेस.
- मंगल कार्यालय मंडप किंवा डेकोरेशन
- क्रीडा साहित्य/स्पोर्ट शॉप.
- फास्टफूड सेंटर / ज्यूस सेंटर.
- क्लॉथ सेंटर किंवा रेडीमेड गारमेंट शॉप.
- मोटर मेकॅनिक किंवा रिपेअर.
- शेतीशी निगडीत पूरक जोडव्यवसाय
थेट कर्ज योजना 2025 ची वैशिष्ट्ये
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने थेट कर्ज योजना अंतर्गत पात्र लाभार्थींना १ लाख रुपये मिळतात. यामध्ये ५० हजार रुपये अनुदान असते तर ४५ हजार रुपये महामंडळाकडून ४ टक्के व्याजदराने कर्ज म्हणून दिले जाते, उर्वरित ५ हजार रुपये लाभार्थीस स्वतः भरावे लागतात.
- कमी व्याजदर: कर्जावरील व्याजदर हा २% ते ४% दरम्यान आहे, ज्यामुळे परतफेड करणे सोपे होते.
- लवचिक परतफेड: कर्जाची परतफेड मासिक किंवा त्रैमासिक हप्त्यांमध्ये ३ ते ५ वर्षांत करता येते.
- थेट लाभ हस्तांतरण: कर्जाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.
- विविध क्षेत्रांना समर्थन: शेती, पशुपालन, लघु उद्योग, आणि स्टार्टअप्ससाठी ही योजना उपलब्ध आहे.
- अनुदान सुविधा: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि महिला लाभार्थ्यांना ३६% ते ४४% अनुदान मिळते.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया: अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे, जी digitaldg.in सारख्या विश्वासार्ह वेबसाइट्सद्वारे समजून घेता येते.
थेट कर्ज योजनेसाठी पात्रता निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
- वय मर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- निवासस्थान: अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे १५ वर्षांचा निवासाचा पुरावा (डोमिसाइल सर्टिफिकेट) असावा.
- जात प्रमाणपत्र: मागासवर्गीय, अनुसूचित जाती, किंवा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जमिनीचा पुरावा: शेती किंवा व्यवसायासाठी जागा स्वतःची किंवा भाड्याने असल्याचा पुरावा (सातबारा, भाडेकरार, किंवा संमतीपत्र) सादर करावा लागेल.
- आधार कार्ड: अर्जदाराकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- बँक खाते: कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी लिंक असावे.
आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला.
उत्पन्नाचा दाखला.
रहिवासी पुरावा.
रेशन कार्ड.
मतदान ओळखपत्र.
आधार कार्ड,
पॅन कार्ड.
व्यवसायाच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे आवश्यक असतात, जसे कि मालाचे किंमतीपत्रक इत्यादी.
वरील सर्व कागदपत्रे सोबत असू द्या आणि मगच ऑनलाईन अर्ज सादर करायला सुरुवात करा.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
थेट कर्ज योजना २०२५ साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे, आणि याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२५ आहे. खालील पायऱ्या फॉलो करा.
प्रत्येक जिल्ह्यासाठी थेट कर्ज योजनेचा एक लक्ष्यांक संबधित विभागास मिळालेला असतो त्यानुसार कर्ज वितरण केले जाते. अर्ज करण्याआधी तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील संबधित विभागाकडून या संदर्भात माहिती घ्या.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट https://mahadisha.mpbcdc.in/schemes वर जा.
- Direct finance scheme हा पर्याय निवडा.
- अर्ज भरा: अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, उत्पन्न, आणि प्रकल्पाची माहिती भरा. सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा: सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक PDF फॉर्म मिळेल, जो तुम्ही डाउनलोड करू शकता.
- अर्जाचा मागोवा: अर्जाचा स्टेटस ऑनलाइन तपासता येईल.
थेट कर्ज योजनाचे फायदे
- आर्थिक स्वावलंबन: कमी व्याजदरामुळे शेतकरी आणि उद्योजकांना व्यवसाय वाढवणे शक्य होते.
- ग्रामीण विकास: ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते.
- महिलांचा सहभाग: महिलांना विशेष अनुदान आणि प्राधान्य दिले जाते.
- डिजिटल प्रक्रिया: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि जलद आहे.
थेट कर्ज योजनेमुळे व्यवसायासाठी कर्ज मिळण्यास सुलभता येते.
योजनेची थोडक्यात माहिती
योजेनेचे नाव. | थेट कर्ज योजना. |
योजना कार्यान्वयन करणारी संस्था | महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन. |
अधिकृत संकेतस्थळ. | https://mpbcdc.maharashtra.gov.in/Site/1525/Direct-Finance-Scheme |
संपर्क. | आपल्या जिल्ह्यातील महामंडळाचे कार्यालय. |
पात्र लाभार्थी. | नव बौद्ध व अनुचित जाती प्रवर्गातील लाभार्थी. |
अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक. | https://mahadisha.mpbcdc.in/new-loan |
थेट कर्ज योजना २०२५ संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
एकूण ₹१,००,००० पर्यंत कर्ज मिळते. त्यातील ₹५०,००० अनुदान स्वरूपात माफ होते, ₹४५,००० महामंडळ देते आणि उर्वरित ₹५,००० लाभार्थ्याने स्वतः भरायचे असते.
फक्त ४% सवलतीच्या दराने महामंडळाकडून दिलेल्या भागावर व्याज लागतो. शासन अनुदानावर कोणतेही व्याज लागत नाही.
अनुसूचित जाती व नव बौद्ध समजतील नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज करताना आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, फोटो, प्रकल्प आराखडा लागतो.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.